Tuesday, January 17, 2012

सांगितले बरेच काही..थेंब अश्रुंचे दोन गालावरती...


कसे पुसायाचे राहून गेले..


लपवलेल जे दु:ख माझे


चार चेहरे पाहून गेले...
सांगितले बरेच काही..

आनंदाश्रु अन काही बाही..

अर्थ सुकल्या आसवाचा परी

लावायचा तो लावून गेले...

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले...

पुसले डोळे...

हसून खोटे

चाचपले कितिक मुखवटे

मुखवट्याला चेहर्‍यावरती

चढवायाचे आज राहून गेले..

लपविलेले जे दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

हसून आता..

विसरून सारे वावरते जणू उनाड वारे...

हसताना पुन्हा भरले डोळे

पापणीतून अश्रु वाहून गेले...

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

कसे पुसायाचे राहून गेले..

लपविलेले दु:ख माझे

चार चेहरे पाहून गेले..

No comments:

Post a Comment