Tuesday, January 17, 2012

मी तुला शोधत आहेप्रेमळ स्वप्नांच्या दुनियेत


मी तुला शोधत आहे


कसा असशील रे तू..!!


या विचारात जगत आहे.


.


.

दुरवर नजरा लावून

तुझ्या येण्याची वाट पाहत आहे

अजुनही तू येत नाहीस

म्हणून तुझ्या स्वप्नातच राहत आहे

.

.

कधी रे येणार तू......??

तुझ्यासाठी अनेक रात्र जागली आहे

सावळया सुवर्णाला या केवळ,

तुझ्या भेटीचीच ओढ़ लागली आहे

.

.

मनी आता माझ्या

तुझाच वास आहे,

कल्पनेतही मला,

तुला भेटण्याचीच आस आहे,

.

.

बोल तुझे एकण्यासाठी

कान आतुर झाले आहेत

काहीतरी बोल रे आता...!!

का शब्ध फितूर झाले आहेत...??

.

.

क्षणभर तुझ्या विचाराने,

मी ग्रस्त आहे,

असशील का मनासारखाच तू....??

यानेच मी त्रस्त आहे.

.

.

येशील तू अलगत,असेल सूर्य मावळत,

अन होउन जाशील तू माझा,

अगदी माझ्याही नकळत

..
मी तुला शोधते आहे,

स्वप्नांच्या दुनियेत आहे,

तुझ्याशी बोलणार कशी..

या विचारात मी आहे...!!

No comments:

Post a Comment