Tuesday, January 31, 2012

ए तुझी कविता एकव ना...

तो एकटा होता,
जसा पानावर दव बिंदू असतो...
त्याला ती दिसली,
निर्मळ,प्रेमळ, प्रेमा सारखी..
पावसाच्या पडणार्या,
...त्या पहिल्या थेंबा सारखी....
तो कदाचित तिच्या प्रेमात पडला,
नकळत अश्रू डोळ्यातून पडतो ना ? तसाच..
वेडा तो, वेड्यासारखा तिच्यातच हारवायचा,
एक थेंब सागरात हजारो स्पंदाने निर्माण करतो ना? तसाच..

त्याने तिचा हात हातात घेतला,
आणि म्हणाला जीवन भर साथ देशील ना...
भरल्या डोळ्या नि ती स्तब्ध बघत राहिली,
खूप प्रेम साचले होते तिच्या डोळ्यात...
त्याने तिला मिठीत घेतले..
त्याच्या खांद्यावर काही अश्रू ! उत्तर देऊन गेलेत...
एकमेकात हरवून,विसरले ते या जगाला,
ती बोलली ...खूप वेळाने..
त्याला ही बरे वाटले...
ती म्हाणाली..
ए तुझी कविता एकव ना...
खूप छान वाटत रे ...
तो प्रयत्न करीत होता कविता म्हणायची,
पण अश्रू काही थांबे ना,
तिने विचारले..
काय झाले...
तो म्हणाला...
तू जाणार आहेस ना मला सोडून?
तिने हात सोडला नि निघून गेली..
दूर ....
तो कविता आजही लिहितो..
त्याचे मन हलके होते..
पण
ती.....
किती मनात दडून ठेवलय तिने..
स्तब्ध मनाने निशब्द ती ही..रङत असते...

No comments:

Post a Comment