Thursday, January 19, 2012

गुलाबी थंडी...

गुलाबी थंडी... 


का कोण जाणे कशी


एकांतात ती आली....


लाडीक चाळे करत


झोंबणा-या वा-यासह



इकडे तिकडे शोधू लागलो

आडोसा...लपण्यासाठी

खूप केला प्रयत्न मग

तिला टाळण्याचा.....



रोमांचलं सारं अंग

अन शहारली काया

हाय तिची कातील अदा

सारे प्रयत्न गेले वाया



येऊन तडक बिलगली

तिनं केलं वश....

क्षणात घेवून मिठीत

आवळले बाहूपाश



मी क्षणभर ओशाळलो

तिच्या स्पर्शाने....

तसं तिने गोंजारलं

मानेवर चुंबनाने



मला कळेच ना

काय होतंय तिथे....

तिने विचारु दिलेच नाही

तू अवेळी कशी इथे..?



पुन्हा लाडीक हसली

म्हणाली...असा घाबरतोस

ये जवळ ये जरा

का दूर मला करतोस



हुडहुडी भरवली तिने

माझी उडवली दांडी

मिठीत घेत म्हणाली

मी गुलाबी थंडी...गुलाबी थंडी...



- अ. भिलारे.

No comments:

Post a Comment