Tuesday, January 31, 2012

आठवून पाहायचो मी काही पावसाळे

आठवून पाहायचो मी काही पावसाळे

आठवून पाहायचो मी काही पावसाळे तिच्या संगतीत भिजलेल
आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी..


(¯`v´¯)
.`•.¸.•´ ★
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~

फक्त तू

फक्त तू

जिच्या नावाच जपं करतो मी
ती आहेस तू

... जिच्या येण्याची वाट बघतो मी
ती आहेस तू

जिच्या नजरेत हरवून जावस वाटतं
ती आहेस तू

जी माझ्या स्वप्नात येते
ती आहेस तू

फत्त तू आणि तूच

माझ्या मनातील राणी आहेस तू
माझे मन जिच्यामुळे चिलबिचल होत
ती आहेस तू


अप्सरांन मधील अप्सरा आहेस तू

माझ्या जिवनातील प्रेमाच किरण आहेस तू
फक्त तू आणि तूच

देवाकडे जिचा हात मागतो ती आहेस तू
माझ्या घरांमध्ये जिच स्थान
बघतो मी ती आहेस तू

मित्रांमध्ये जिच नाव सारख
घ्यावस वाटतं ती आहेस तू

जिला बघून जगावस वाटत
ती आहेस तू
फक्त तू आणि तूच

होता श्वासात तेव्हा,

होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,

नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,

आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,

जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,

जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,

किती....? मी मरावं किती.....?

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....? सोडुन
गेलीस मला मी झुरावं किती.....? येशील
ना गं भेटायला वाट पाहावी किती....?
नावरुप नसणारी असतात काही नाती.....
मग
ती नाती टिकवताना समाजाची का भिती....?
समजुन का घेत नाहिस मला मी झुरावं
किती.....? आज येईन ऊद्या येईन
गेली सुट्टी सरुन...... कधी येशील
जेव्हा मी जाईन मरुन..... प्रेम नाहिस करत
माझ्यावर माहित आहे मला..... जाण
ठेवावी काही गोष्टींची भान आहे तुला......
झालीस तु दुसय्राची मी झुरावं किती......?
एक वेडा बसला लावुनी तुझी आस...... तीच
आस बनु नये त्याच्या जिवनाचा फास...... तुच
सांग ना मी विश्वास कुणावर ठेवु.....?
प्रत्येक क्षण , दिवस मी झुरावं किती.....?
दोन घटकेच्या आयुष्यात मी मरावं
किती....? मी मरावं किती.....?

सार काही संपल

दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने
जगच माझे लुटल
रचत बसलो स्वप्न
स्वताला फसवत फसवत
कसे समजावू मनाला
स्वप्न आता ते तुटल
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
टव टवित प्रीत फुल माझे
क्षनामध्ये आचानक सुकल
जगविल होत ज्याला मी
आयुष्याची किंमत मोजुन
त्यानेच सांगितले आज
आसतित्व माझे मिटल
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
नाही दोष तुला देणार
तुझे तर सारेच मी मानल
तुझा प्रत्येक आश्रू पुसन्यासाठी
रक्त ही माझे सांडल
कसे सांगू हे बोलण्या पेक्ष्या
तु प्राणच का नाही घेतल ?
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने
जगच माझे लुटल..♥

ए तुझी कविता एकव ना...

तो एकटा होता,
जसा पानावर दव बिंदू असतो...
त्याला ती दिसली,
निर्मळ,प्रेमळ, प्रेमा सारखी..
पावसाच्या पडणार्या,
...त्या पहिल्या थेंबा सारखी....
तो कदाचित तिच्या प्रेमात पडला,
नकळत अश्रू डोळ्यातून पडतो ना ? तसाच..
वेडा तो, वेड्यासारखा तिच्यातच हारवायचा,
एक थेंब सागरात हजारो स्पंदाने निर्माण करतो ना? तसाच..

त्याने तिचा हात हातात घेतला,
आणि म्हणाला जीवन भर साथ देशील ना...
भरल्या डोळ्या नि ती स्तब्ध बघत राहिली,
खूप प्रेम साचले होते तिच्या डोळ्यात...
त्याने तिला मिठीत घेतले..
त्याच्या खांद्यावर काही अश्रू ! उत्तर देऊन गेलेत...
एकमेकात हरवून,विसरले ते या जगाला,
ती बोलली ...खूप वेळाने..
त्याला ही बरे वाटले...
ती म्हाणाली..
ए तुझी कविता एकव ना...
खूप छान वाटत रे ...
तो प्रयत्न करीत होता कविता म्हणायची,
पण अश्रू काही थांबे ना,
तिने विचारले..
काय झाले...
तो म्हणाला...
तू जाणार आहेस ना मला सोडून?
तिने हात सोडला नि निघून गेली..
दूर ....
तो कविता आजही लिहितो..
त्याचे मन हलके होते..
पण
ती.....
किती मनात दडून ठेवलय तिने..
स्तब्ध मनाने निशब्द ती ही..रङत असते...

कळत नकळत सगळ घडत होते,

कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते

चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच

जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच

माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच

जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच

माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच

मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे.............

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे ?

तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
’नाजुक’ शब्द सुद्दा जरा जड वाटतं.

मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.

कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

वेड मन माझं

तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते

तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत

वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच

क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना....

थोडा विचार कर ना रे ?

मी म्हणालो मनाला
थोडा विचार कर ना रे ?
बद्लतय जग सारे
थोडा तू बदल ना रे ?
विसर जुन्या रुढी परंपरा
मनाची कवाडे थोडी उघड ना रे
आपलीच आहेत ती लेकर
बरोबर त्यांच्या चाल ना रे
मी म्हणालो मनाला
आजूबाजू ला जरा बघ ना रे
संपलय आपले कर्तुत्व
नव्या पीढित रम ना रे
प्रत्येक पीढीच विद्रोही आसते
स्वताची तरुनाई आठव ना रे
विश्व चक्र हे आसेच चालणार
नवी पीढी जुन्याशी भांडनार
बदल स्रुस्तिचा अटळ नियम
एवध तरी समज ना रे
मी म्हणालो मनाला
थोडा विचार कर ना रे ?

देशील का?

देशील का?
देशील का?

सहवास मला हवा तुझा,
प्रेमाचा सुवास देशील का?
... मी आहे प्रेमी तुझा,
होकार मला देशील का?

मनातील घरात आहे मी एकटा,
जीवनसोबती म्हणून येशील का?
असला नकार सर्वांचा तरी,
तू मला होकार देशील का?
असला दुरावा आपल्यात तरी,
तू जिव्हाळा निर्माण करशील का?

चार भिंतींच्या घरात,
विसावा मला देशील का?
खडतर या जीवनाला,
साधे सरळ म्हणून घेशील का?
नाही प्रेम द्यायचे तर,
मला मरण तरी देशील का?

मैत्रि अपुली अशी असावी,

मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

तुझ्याचसाठी

क्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता
तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता

ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन
मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता

वाटेवरती अनंत काटे सदाच होते
आता मी अग्नीतुन चालिन जाता जाता

नास्तिक नव्हतो तरी कधी मी नाम न जपले
"निर्भिड होता" तूही म्हणशिल जाता जाता

स्वर्ग असे ऐषारामी हे कपोलकल्पित
माझा अनुभव लिहून ठेविन जाता जाता

तुझ्या मैफलीमधे जाहलो स्वराधीन मी
तुझ्या बंदिशी मीही गाइन जाता जाता

पहाट करते रंगसंगती किती अनोख्या
मी रंगांचे सुगंध उधळिन जाता जाता

ह्या जगण्याला आकाशाचे प्रेम दिले मी
मरणालाही पहा हासविन जाता जाता

"माझ्या अधुऱ्या कवितेला तू पूर्ण करावे"
अंधुक नजरा भिजवुन सांगिन जाता जाता

....रसप....
३१ जानेवारी २०१२

मित्रोत्सव २०१२

मित्रोत्सव २०१२ 
राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव 


दिनांक १० फेब्रुवारी २०१२ 


वेळ - सायंकाळी ६ ते १०.


सहकार सभागृह ,


स्टेशन रोड ,


अहमदनगर.


एन्ट्री पासेस साठी संपर्क .


केदार - ८०५५३७३७१८


अतुल- ८२७५२००७१७ 


सचिन - ९४०४८८९२४०

Friday, January 27, 2012

मित्रोत्सव २०१२ शोर्ट फिल्म फेस्टिवल,.............मित्रोत्सव २०१२ शोर्ट फिल्म फेस्टिवल चे एन्ट्री पासेस  उपलब्ध असून .


ज्यांना ज्यांना तिकिटे घ्यावयाची असतील त्यांनी मित्र क्रिअशन च्या 


दिल्ली गेट ऑफिस वर किंवा ८०५५३७३७१८ या क्रमांकावर संपर्क 


साधावा.
हा कार्यक्रम सहकार सभागृह अहमदनगर येथे दिनांक १० फेब्रुवारी 


२०१२ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे.यामध्ये विविध प्रकारच्या २० शोर्ट फिल्म्स दाखवण्यात येणार असून 


कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे.तिकिटांसाठी पत्ता- मित्र क्रिएशन ,गोल्डन गेट ज्वेल्लेर्स च्या मागे, अभिषेक झेरोक्स च्या मागेदिल्ली गेट अहमदनगर.मो. ८०५५३७३७१८

Friday, January 20, 2012

माझ्या नसलेल्या मित्रासाठी त्याचीच कविता ...त्यालाच

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्या मनाच्या अंगणात

रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा

जसा स्वीकारला होता

तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,

फक्त तुझ्यासाठी....

पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली

तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द

फक्त तुझ्यासाठी.....

यापुढे माझ्या कविता

तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता

तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....!
मला आवडेल तुझी वाट पहायला...

मला आवडेल तुझी वाट पहायला...

फुलपाखरांसोबत स्मृतींच्या पंखांनी उडायला

आभाळभर पसरलेल्या क्षणांना एकसंध शिवायला,

मला आवडेल तुझी वाट पहायला...

तुझे पाऊलश्वास मन लावून ऐकायला,

तू आल्यावर तुला एकटक पहायला

''किती बोलतोस रे तू? जरा धीर धर

बोलण्याआधी थोडा विचार तरी कर''

पण नाही; तू म्हणतोस:

''माझं असंचे!

मला आवडतात मनातले भाव पटकन सांगायला! ''

मी हसते, अन. मनातंच म्हणते,

'मला मात्र आवडेल हं तुझी वाट पहायला'...

रात्र झाली, की तुझ्या स्वप्नांमधे हरवून जायला,

तुझ्या कुशीत सारी दुःख विसरायला...

हातात हात मात्र ठेव हं कायमचा!

कारण मला आवडेल, जन्मभर ''फक्त तुझीच'' बनून रहायला

मला आवडेल तुझी वाट पहायला...!!!

रात्री झोपेतही केवळ तुझ्या, भेटीचीच स्वप्ने पाहते...!!!

माझ्या आयुष्यात तुझ येण,


माझ्यासाठी अगदी खास आहे,


मी कायमची तुझीच राहावी,


हीच मनात आस आहे.


नेहमी मला केवळ,


तुझ्या भेटीचीच ओढ असते,

कितींदाही भेटलो तरीही,

मनी ती एकच हुरहूर असते,

तुझ्या सहवासात मी,

स्वत:लाच हरवून बसते,

तुझ्या होणाऱ्या त्या स्पर्शाने,

मी पूर्णपणे मोहरून जाते.

मिठीत तुझ्या आल्यावर,

मन तुझ्यातच रमून राहते,

तू काहीच बोलत नाही,

आणि तुझा स्पर्श सारे सांगून जाते.

तुझ्या स्पर्शाच्या भाषेला मग

मन हि माझे फितूर होते,

तू भेटून गेलास तरी परत,

तुला भेटण्यासाठी आतुर होते.

तुझा आठवणीत आजकाल,मी एवढी गुंतून जाते,

रात्री झोपेतही केवळ तुझ्या,

भेटीचीच स्वप्ने पाहते...!!!

आणि तू मला... अचानकच ...

'लक्ष कुठाय तुझ ?'


तुझा प्रश्न


'अं?काही नाही '


माझ उत्तर


'जा,मी नाही बोलत'


तू म्हणतेस

फुगलेले तुझे गाल पाहून

मी सुखावतो

'बोल ना'

म्हणुन विनवतो'बर बर 'सांगायला जणू

ओठ तुझे विलग होतात

'मी नाही जा'

अरे!भलतेच शब्द बाहेर पडतात

मला आणखी गम्मत वाटते

मग तुझ ख़ास ठेवानितल

नाव घेउन

'बोल ना प्लीज़ '

म्हणतो

मग तू उठून चालु लागतेस

आणि मी तुझ्यामागुन...

तू दणादणा पाय आपटत निघतेस

आणि मी मधुनच रस्त्याने

एखाद फूल खुडतो

तू रागातच

मी सुखातच

शेवटी तुझ एक पाय जोरात

माझ्या पायावर पडतो

आणि माझ्या मुठीतल ते फूल

जमिनीला मीठी मारत

आणि तू मला... अचानकच ...

प्रत्येक क्षणी तू हवा आहेससाथही तुझी हवी आहे मला


फक्त तू नकोस मला


साथही तुझी हवी आहे


शांत स्थळी एकांतवेळी


प्रीत तुझी हवी आहे


शृंगार प्रेम नको मला

वात्सल्य प्रेम हव आहे

सांजवेळी सूर्यास्ताला

प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला

रिमझिम पाऊस हवा आहे

रानफुलाला सुखावणारा

गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला

अर्थ त्यातला हवा आहे

तिमिरातून तेजाकडचा

मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला

द्रुष्टी तुझी हवी आहे

तुझ्या डोळ्यात दिसणारा

विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला

सहवास तुझा हवा आहे

खचनाऱ्या माझ्या मनाला

आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला

प्रत्येक क्षणी तू हवा आहेस

वेळ तुझी नको मला

वेळीस तू हवा आहेस

आधार

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,


तिला पाहताच त्याला तीच वेड लागल वेलीला विचारू तरी कस?


या प्रश्नाने त्याला पछाडल, पण,


आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वत:ला सावरल,


वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,


ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,

ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेल म्हणाली ,

झाडा मला तुझा आधार हवा आहे ,

तू मला आधार देशील का ??

यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,

ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,

विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,

अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,

कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला....हे अस्स्सचं का होतं....!!

हे अस्स्सचं का होतं....!!

हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं..

भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ
परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ..

Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range
1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change....

दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी'
Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'....

5 रु . चा समोसा Multiplex मध्ये का होतो रुपये वीस
Important कामाच्या वेळी फास्ट लोकल का बरे होते मिस्स्स....

पावसाळा आहे माहीत असून, पाऊस आल्यावर का येते चीड..?
योगायोगाने एखादी पोरगी आवडलीच तर असते ती 'Just Married'

समजत नाही हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटचं का घडतं..!!!
*Author Unknown*

Thursday, January 19, 2012

माझ्या कडे धावतेस..!!

पत्रात मावणार नाही,
इतके प्रेम करतेस..!
वाट नसून ओळखीची,
माझ्या कडे धावतेस..!!

धावणं नाही होत कमी,
मनी प्रीतीची ओढी..!
लिहिल्या शिवाय कळेल मला,
हीच माझी हमी..!!

कधी पडशील धावताना,
विचार मनी आणू नकोस..!
ओढ तुझी उत्कट,
मीही तुझाच विसरू नकोस..!!

प्रेमाशिवाय जगणं नाही,
मनी प्रीतीचा सागर..!
कितीही असला दुष्काळ,
प्रीतीची भरते घागर..!!

किती असतील गुंते,
तमा बाळगू नकोस..!
सोडवू सर्व प्रेमाने,
विश्वास मनचा सोडू नकोस..!!

असेल नेहमी माझी साथ,
जिंकेन - हरेन विचारू नको..!
जगावं आयुष्य आनंदे,
क्रोधाची माया जमवू नको..!

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,


कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,

मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,

रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,


स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,

क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,

वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,

मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,

याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,

मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,

चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,

तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,

जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,

माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली..!!!!!!

तुला मनात ठेउन मी घरी परतलेसमोर आलास तू , निखळ हसू घेउन


मनमोकळया गप्पा मारल्या तुझ्या बोलक्या डोळ्यात पाहून


सामान्य होता तो दिवस, तरीसुद्धा सर्वात निराळा


वाटलं नव्हतं तुझ्या रूपात आयुष्याचा सोबती मिळेल मला
नव्हती गाणी, झगमगाट नव्हता

न स्वप्नातल्या राजकुमारासरखा तू घोड्यावर होतास

फक्त होत्या गप्पा आणि अगणित विषय

बोलत राहिलो आपण आणि वेळेचा पत्ताच नव्हतातुला मनात ठेउन मी घरी परतले

तुझ्या समवेत गेलेल्या वेळेचा विचार करत राहिले

निर्मळ प्रेमळ अगदी मला साजेसा वाट्लास

सहजच ह्रुदयात जागा करून राहिलासअजुनही तो दिवस आठवतो पुन्हा आपली भेट झाली

परत एकदा भरपूर बोलायची संधी मिळाली

निरागसपणे सांगत होतास तुझ्या मनातल्या गोष्टी

एकरूप होतील का त्या माझ्या आयुष्याशी?बागडत दुसर्या दिवशी मी तुझ्याकडे आले

नकळत पुन्हा एकदा गप्पांमध्यें गुंतून गेले

सोपवेन कायमचा हात तुझ्या हातात

देशील का अशीच आयुष्यभराची साथ?सगळी कोडी सुटली आणि मी तुझी झाले

एकमेकांपासून दूर असण्याचे क्षण सुद्धा नाहीसे झाले

जीवनातील दुःख आता तुझ्या सोबत विरघळतात

आनंदाचे क्षण मोहरून खुलतातगौरी कोतवाल-पांडे २४-०४-२००९

ए आई,

ए आई...


लहान बाळाला काय समजतं?


असं आपल्याला नेहमी वाटत..


भूक लागली कि रडायचं,


अन पोट भरलं कि हसायचं ..


पण त्याच रडण्यातून आणि हास्यातून ते आपल्याला खूप काही सांगत 


असतं..ए आई,

सतत मला तुझ्या छातीशी असू दे,

अंगाईगीतापेक्षा मोहक तुझ्या हृदयाचे ठोकेतूच मला सकाळ संध्याकाळ घाल जेऊ,

मग गोष्टीत तुझ्या असो काऊ किंवा चिऊरात्री सुद्धा मी तुझ्याच कुशीत झोपेन,

आणि दचकून उठलेच तर तुझीच उब शोधेनमाझी नजर फिरली तरी तू माझ्याचकडे बघत रहा

तुझ्याकडूनच कितीतरी नवीन गोष्टी शिकते मी, जरा निरखून पहातुला काय वाटत, मला काही समजत का नाही?

तुझी नजर फिरतच मी रडते कि नाही..!-
गौरी कोतवाल-पांडे

तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....
- कमलेश गुंजाळ

गुलाबी थंडी...

गुलाबी थंडी... 


का कोण जाणे कशी


एकांतात ती आली....


लाडीक चाळे करत


झोंबणा-या वा-यासहइकडे तिकडे शोधू लागलो

आडोसा...लपण्यासाठी

खूप केला प्रयत्न मग

तिला टाळण्याचा.....रोमांचलं सारं अंग

अन शहारली काया

हाय तिची कातील अदा

सारे प्रयत्न गेले वायायेऊन तडक बिलगली

तिनं केलं वश....

क्षणात घेवून मिठीत

आवळले बाहूपाशमी क्षणभर ओशाळलो

तिच्या स्पर्शाने....

तसं तिने गोंजारलं

मानेवर चुंबनानेमला कळेच ना

काय होतंय तिथे....

तिने विचारु दिलेच नाही

तू अवेळी कशी इथे..?पुन्हा लाडीक हसली

म्हणाली...असा घाबरतोस

ये जवळ ये जरा

का दूर मला करतोसहुडहुडी भरवली तिने

माझी उडवली दांडी

मिठीत घेत म्हणाली

मी गुलाबी थंडी...गुलाबी थंडी...- अ. भिलारे.