Tuesday, February 11, 2014

मराठी चित्र कविता वाचा नवीन ब्लॉग वर …

मराठी चित्र कविता वाचा नवीन ब्लॉग वर … 
कवी सागर वाव्हळ /यांच्या  प्रसिद्ध कविता  वाचा  आता त्यांच्या ब्लॉग वर . 

त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा …। 
http://sagarwavhal.blogspot.in

Saturday, February 1, 2014

एक दिवस असा होता की,

एक दिवस असा होता की,
कुणीतरी माझ्या,
फोनची वाट पहायचं.....

स्वतःच फोन करुन,
मनसोक्त बोलायचं,
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....

एक दिवस असा होता की,
कुणीतरी तासनतास,
माझ्याशी गप्पा मारायचं.....

एक दिवस असा होता की,
मनमोकळे पणानं,
मला सर्व काही सांगायचं.....

आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं,
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,
वेळ देऊनही फोन नाही करायचं.....

आज दिवस असा आहे की,
मी माझं नातं मनापासुन जपायचं,
मिळालेल्या वागणुकीतून मन मात्र
दुःखायचं.....

पण ???

माझं हे दुःख कोणाला कळायचं.....

आज प्रश्न असा आहे की,
का कुणाशी स्वार्थासाठी नातं
जोडायचं,
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र
सोडायचं.....

का स्वतःचं व दुस-याचं,
जीवन भकास करायचं
मित्रा, आपल्याला नाही हे जमायचं.....

दुःखातही आपण मात्र हसायचं,
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....  

फरक फक्त इतकाच असेल ???

Break-Up Ke Baad.....

चार फुले तुझ्यावर पडतील,

चार फुले माझ्यावर पडतील.....

फरक फक्त एवढाच असेल ???

तु तेव्हा मंडपात असशील,

आणि मी असेन स्मशानात...!!

बरोबर एक वर्षांनी तिच,

गडबड असेल, लगबग असेल.....

फरक फक्त इतकाच असेल ???

तुझ्या घरी बारश्याची तयारी असेल,

आणि माझ्या घरी माझे श्राध्द
असेल...!!
    

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील..

रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करते

चुकता त्याच्यासाठी काहीतरी मागत
असते
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून
स्वता: साठीपण
मागत जा त्याला म्हटले त्याच्याशिवाय
माझे
आयुष्य तरी आहे का
मला झोपायला जमीन दिलीस
तरी चालेल .... पण

त्याला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस
तरी चालेल ... पण
त्याला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण
त्याच्यासाठी ... न
विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले
तरी चालेल ... पण
त्याला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ...
पण
त्याच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न
रडणाऱ्या देवाचा डोळा पण
तेव्हा पानावला,
का करतेस इतके प्रेम त्याच्यावर त्याने
प्रेम तुझे
स्वीकारले नाही, का मरतेय
त्याच्यासाठी त्याने
जगणे तुझे मान्य केले नाही,
मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे
तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात
पडशील.. —

प्लीज परत येशील का ???

प्लीज परत येशील का ???
मला नेहमी सारखं,
बावळट बोलायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्याशी कारण नसताना,
खोटं खोटं भांडायला.....

प्लीज परत येशील का ???
कसा रे वेडा तु,
सोन्या म्हणायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्याशी फोनवर तासन-तास,
गप्पा मारायला.....

प्लीज परत येशील का ???
मधाळ हसतात कसं,
मला दाखवायला.....

प्लीज परत येशील का ???
माझे ओघळणारे अश्रूं,
ओँझळीने अडवायला.....

प्लीज परत येशील का ???
प्रेम कसे करतात,
मला शिकवायला.....

प्लीज परत येशील का ???
माझे विरहात होणारे,
हाल पहायला.....

प्लीज परत येशील का ???
दुःखाच्या दरीत,
पुन्हा ढकलायला.....

प्लीज परत येशील का ???
फसवे नाते खोटी वचने,
पुन्हा तोडायला.....

प्लीज परत येशील का ???
ह्रदयाला झालेल्या,
जखमा भरायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्या मुडद्याला एकदा,
बिलगुन रडायला.....

प्लीज परत येशील का ???
माझा जळणारा निष्पाप,
देह पहायला.....

प्लीज परत येशील का ???
   

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे....