Thursday, January 19, 2012

तु बरोबर असताना

तु बरोबर असताना
कोण कोणाचे आहे
कळालेच नाही
काय होतीस माझ्यासाठी
कधी समजुन घेतलेच नाही ...
आनंदाच्या क्षणात
बेहोश होऊन नाचताना
सर्वजण माझ्याबरोबर असतात
तु मात्र दुर कोपय्रात ऊभी असतेस
का म्हणुन कधी विचारलेच नाही ...
जेव्हा जेव्हा डोळे माझे पाणावतात
कुणास ठाऊक ,
तु एकटीच माझ्याबरोबर असतेस
माझ्या दुःखात साथ देणारी तु
वेदना तुझ्या कधी
समजुन घेतल्याच नाही ..
सोडून जाताना मन तुझे
कुणासाठी तरी तिळतिळ तुटत होते
वेडा आहे मी माहीत होते तुला
या वेड्यातच तुझे विश्व होते
ते या वेड्याला मात्र कधी समजलेच नाही ...
तु गेलीस ,
सर्व काही आहे माझ्याकडे
पण माझं म्हणुन कोणीच नाही
तुझ्यावाचुनी जगणे काय आहे
आज नियतीच विचारुन पाही
कळुन चुकले मला आज
तुझ्यासारखी सखी
कधीच मिळणार नाही..!!!!!!

No comments:

Post a Comment