Friday, January 20, 2012

रात्री झोपेतही केवळ तुझ्या, भेटीचीच स्वप्ने पाहते...!!!

माझ्या आयुष्यात तुझ येण,


माझ्यासाठी अगदी खास आहे,


मी कायमची तुझीच राहावी,


हीच मनात आस आहे.


नेहमी मला केवळ,


तुझ्या भेटीचीच ओढ असते,

कितींदाही भेटलो तरीही,

मनी ती एकच हुरहूर असते,

तुझ्या सहवासात मी,

स्वत:लाच हरवून बसते,

तुझ्या होणाऱ्या त्या स्पर्शाने,

मी पूर्णपणे मोहरून जाते.

मिठीत तुझ्या आल्यावर,

मन तुझ्यातच रमून राहते,

तू काहीच बोलत नाही,

आणि तुझा स्पर्श सारे सांगून जाते.

तुझ्या स्पर्शाच्या भाषेला मग

मन हि माझे फितूर होते,

तू भेटून गेलास तरी परत,

तुला भेटण्यासाठी आतुर होते.

तुझा आठवणीत आजकाल,मी एवढी गुंतून जाते,

रात्री झोपेतही केवळ तुझ्या,

भेटीचीच स्वप्ने पाहते...!!!

No comments:

Post a Comment