Wednesday, January 18, 2012

जुन्या वहीची पानं चाळताना ...

जुन्या वहीची पानं चाळताना

जुन्या वहीची पानं चाळताना,


मोरपिसं हातात पडतं.


मोरपीस गालावर फ़िरताना,

आठवणींशी नातं जडतं…या आठवणींत बुडुन जाताना,

आजचं नाही उरत भान.

क्षण ते परत ना येतील आता,

तीच होती सुखाची खाण…आठवणी असतात अनेकांच्या,

तुमच्या, माझ्या, सर्वांच्या.

प्रत्येकाची असते एकतरी आठवण,

दु:खाची अथवा सुखाची साठवण…माझ्याही आहेत अशाच आठवणी,

पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या.

जीवन झाल्या त्याच आठवणी,

सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रदयात रुजुनि गेल्या,

काही त्यातल्या बुजुनही गेल्या.

मनात काहींनी घर केले

पण…

क्षण आता ते उडुन गेले…आठवणी आठवाव्या लागत नसतात,

आपोआप त्या आठवत असतात.

पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे,

सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात…No comments:

Post a Comment