Wednesday, December 12, 2012

शांत झोपून मरायच आहे...........!!!!

मला ही वाटायच,
मला ही वाटायच,
तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
आणि तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव,
मला ही वाटायच,
तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,

मग खुप बोलुन थोडा वेळ शांत राहाव,
मला ही वाटायच,
तु मला जवळ घ्याव,
मिठी मारून मला घट्ट धराव,
मला ही वाटायच,
तुझ्या मिठीत मी सर्व विसराव
आणि फक्त तुलाच आठवाव,
मला ही वाटायच,
तुझ्या बरोबर खुप भांडव
अन भांडन मिटवून पुन्हा गोड व्हाव,
मला ही वाटायच
तुझ्या सुखात सामिल होउन घ्याव,
मग तुला त्याहीपेक्षा खुप सुख दयाव,
मला ही वाटायच
तुझ्या दुखात तुझ्या सोबत रडाव,
मग ते दुःख माझ्यावर घेउन तुला हसवाव,
मला ही वाटायच
तुझ्याबरोबर एकत्र बसून जेवाव,
आणि जेवण माझ्या हाताने तुला भरवाव,
मला ही वाटायच
तुझ्या सोबत माझ नाव जोडल जाव
आणि ते नाव सर्वांनी एकत्र घ्याव.......
आज ही मी तुझ्यावर येउन अड़ते,
तुझ्या आठवनीने रडू आले की
अश्रु अडवून धरते,
तोल सुटला की स्वतःहाला
सावरन्याचा प्रयत्न करते,
तू तर जीव घेऊन निघून गेलास,
पण आज ही जीव जावून रोज असाच
जगण्याचा प्रयत्न करते,
एकट - एकट खुप रडलेय मी,
आता मला तुझ्या मांडीवर डोक
ठेउन एकदा रडायच आहे,
आणि जाण्यापूर्वी तुझ्या कुशीत
शांत झोपून मारायच आहे
शांत झोपून मारायच आहे...........!!!!

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )

चुली जवळ माय,
तर कंपनीत तुम्ही राबत होता..

माझी वाट तुम्ही,

ते नऊ महिने पाहत होता..

पाळण्यात मला पाहून,
पेढे वाटायलाही पळाला होता..

बोटाला तुमच्या धरून,
शाळेत दाखला मी घेतला होता..

फाटकी बनियन तुम्ही,
तर नवीन गणवश
मी घातला होता..

बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!

ताप मला असो का ताईला,
रात्र-रात्र तुम्ही जागत
होता..

शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत
होता..

बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे
होता...!!

देवा,
आता मात्र मला,
त्यांच्यासाठी कष्ट करू दे..

तू फक्त आता,
जगातील सर्व बाबांना,उदंड आयुष्य दे... :)

*..*..*..*..आई..*..*..*..*

डोळे मिटुन प्रेम करते,

ती प्रियासी..

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,


ती मैत्रिण..

डोळे वटारुण प्रेम करते,

ती पत्नी..

आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
ती फक्त आई..

............. i love u .............

*..*..*..*..आई..*..*..*..*

तुला पाहिलं की

तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात

तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात
तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत
कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात .... —

Lovstroy

कळत मला तुझं प्रेम आहे माझ्यावर...
पण.......
Propose नावाची गोष्ट तुला का करता
येत नाही????
.
कळत मला नाही राहू

शकत तू माझ्याशिवाय....
पण........
I love u हे sweet शब्द
तुझ्या ओठांवर का येत नाही????
.
.
त्याच मन:- ♥♥♥
.
.
माझे तुझ्यावरचे प्रेम हेतुला ही कळत....
पण..........
व्यक्त करावाच प्रत्येकवेळी प्रेम असे कोण
म्हणतं???
.
थोडी अजब लोकांसारखी
गजब Lovstory आहे आपली पण stroy
असं तूलाही वाटतं
पण..........
I Love u बोलल्याशिवाय
Lovstroy घडत नाही

अन हरवले ते सुंदर नाते..

निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती,
का छळतो हा उनाड वारा
दिसत नाही का त्याला मी जळताना..

जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी,
तो ही दिसे आज हळहळताना..
कदाचित तू दिलेल्या प्रेमाचा शपथा
त्याने ही चोरून पहिल्या असतील,
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा
अजूनही तशाच राहिल्या असतील..
तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे केस
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
अन कोण तुझा साठी झुरत असेल..
हरवली ती संध्याकाळ
अन हरवले ते सुंदर नाते..
परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते.

Thursday, September 6, 2012

सागर आव्हाड

माझा मित्र सागर आव्हाड याचा आजच्या दिनांक ६/९/२०१२ रोजी दैनिक सकाळ मध्ये संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला लेख ......



Wednesday, August 29, 2012

"आता खरच सवय झालीये....!

आता खरच सवय झालीये....!
"आता खरच सवय झालीये....!


एकट्यानेच चालायची,


आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची.


सवय झालीये....


मनातल्या मनात रडायची,

आणि ठेच लागुन पडायची.


सवय झालीये....


आपल्या मानसापासून दूर जायची,

आणि डोळे भरून त्यांची वाट पहायची.


सवय झालीये....


जिंकत नसलो तरी हरायची,

आणि आयुष्य एक एक दिवसाने भरायची.


सवय झालीये....


स्वतःवरती रुसन्याची,

आणि नाव पुन्हा पुन्हा लिहून पूसन्याची.


सवय झालीये....


पोरक करणाऱ्या मायेची,

आणि उन्हात मला तडफडत सोडून जाणाऱ्या छायेची.


सवय झालीये....


त्याच त्याच शब्दाना फसन्याची,

आणि स्वतः स्वतःवर हसण्याची.


सवय झालीये....


जिवंतपनी मरायची,

आणि शेवट नसलेली सुरुवात करायची.


सवय झालीये....


स्वतःच्या अश्रुमधे सांडायची,

आणि तेच भिजलेले शब्द मांडायची.


आई शपथ,

आता खरच सवय झालीये...."
...........

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना, पण माझ्यासाठी, दोन अश्रु गाळशील का?

माझ्या नावाचं मंगळसुत्र, तू नाही घातलं तरी;

माझ्यासाठी एक दिवस, तू वैधव्य पाळशील का?

जन्मभराची साथ, नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत, तू दोन पावलं चालशील का?

माझ्यासाठी तू, कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर, तू दोन फुलं उधळशील का?

विचार करायला, उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी, उराशी कवटाळशील का?

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत
असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस तू
समोर नसतेस तेंव्हाझोपू देत नाहीस तो ढग बघ
कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब
गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनं
दलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श
नाही. येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस
जरी गेला तरी तुझी आठवणजात नाही. आज सारे
विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू
कधी खरे प्रेम करशील कुणावर...... तेव्हा सागर
किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात
लपता........ नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर
हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.कसे करू माफ़ तुला जे
घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच
मला दिले...... डोळे पुसण्यास माझे पाऊस
धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच
कळेना म्हणाला. आज पुन्हा तुझी आठवण
आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं
हसताना... कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच
समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत
नाही अंतर मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का? ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यातजादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे,
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदरवाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जातनाही ,
रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,
प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील,
खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !

च्यायला !!!! मी काय खोटे बोलतोय काय!!!

च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,...........
च्यायला, प्रेम म्हणजे असतं काय,
खाली डोके वर पाय,
नुसताच गोंधळ, कल्लोळ सारा,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!


पण प्रेमात असं व्हावचं लागतं,
थोडसं हसावं अन थोडसं रडावंच लागतं,
धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं,
बोला मी खोटे बोलतोय काय!!!!

ती दिसली तरी त्रास,नाही दिसली तर दुप्पट वैताग,
आपल्याला मग काही सुचत नाही, मग ती आल्यावर चुप बसताच येत नाही.
बिचारी मान खाली घालुन शिव्या खाते, स्वतःची चुक मान्य करते,
खरतर तिला दुखवावेसे मला मुळीच वाटत नाही, पण तिचे अश्रु पिल्याशिवाय आपल्याला बरेच वाटत नाही.
अरे दोस्तहो, तुम्हाला काय वाटलं मी फ़ेकतो,
च्यायला !!!!
मी काय खोटे बोलतोय काय!!!

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी


प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीस
मनात होती वादळं पण अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद

एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?

मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य

अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच नसतो 'नंतर'
हळद मेंदी, सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-या सहीपाशी सांडल्या ...!

Friday, June 29, 2012

....माझाच असतोस तू...

वार्याची झुळूक यावी, तसा येतोस तू...
पावसाची सर जावी, तसा जातोस तू...
कडकत्या उन्हात, सावली सारखा असतोस तू...
अन खूप लांब असूनहि, खूप जवळ भासतोस तू...
ध्यानी मनी नेहमीच तू...
चंद्रा मध्ये हि दिसतोस तू...
उदास असेन....
तर माझ्या बाजूला बसतोस तू..
अन मला हसवण्यासाठी...
खूप काही करतोस तू ....
माझ्याच नकळत..
माझ्या मनाला, नेहमीच बरोबर वाचतोस तू...
मित्र असून हि, का रे ?
खूप वेगळाच वाटतोस तू ...
अबोल्यातूनहि तुझ्या, खूप काही बोलतोस तू ...
अन माझा नसूनही फक्त....
....माझाच असतोस तू...
माझा नसूनही...
फक्त...
...माझाच असतोस तू...

मला न सांगता अशी ती कुठे गेली.?

ती असते कुठे
ती दीसते कुठे
शोधत राही मन माझे
जीथे कधी होते
अस्तीत्व तीचे.

काही माहीत नाही
कुठे गायब झाली,
मला न सांगता अशी
ती कुठे गेली.

तीला वाटले तीचे प्रेम
मी जाणले नव्हते,
तीची ओढ पाहुन सुधा
प्रेम मला कळले नव्हते.
मला फक्त थोडा
वेळ हवा होता,
कारण माझ्यासाठी हा
खेळच नवा होता.

माझ्या नकळत असे
तुझे ते चोरुन पाहने,
पण माहीत नव्हते तुला
मी तुझा पाठलाग करने.

तु माझ्या अयुष्यात
नवी पहाट बनुन आलीस,
भर उन्हात मला
चींब भीजवुन गेलीस.

आता अशी माझ्यापासुन
दुर तु जावु नकोस,
पंख नसलेल्या पाखराचा
खेळ पाहू नकोस...

@sagar chikhalekar

Thursday, June 28, 2012

काय नाते आहे?



तिचे ओळखीचे
असूनही अनोळखी असणे...
आवडते मला दोन क्षण
तिच्या सभोवती असणंही...
आवडते मला ऱोज बहाणे
करुन तिच्याकडे जाणे...
आवडते मला तिने
माझ्याकडे एक कटाक्ष
टाकणे.. आवडते मला..
कधीही डोळ्यात डोळे
घालून विचारले, तर
हो म्हणेल ती, पण तिचे
डोळे झुकवून 'नाही'
म्हणणे... आवडते
मला ती आहेच
माझ्यासाठी खास, तिने
मला काहीही म्हणावे
मजनू, पागल किंवा वेडा...
ते आवडते मला..!
तिला लोक कमळाचे फ़ुल
म्हणतात, ती नुसतीच
हसते.. लोकांचे मला भ्रमर
म्हणणे... आवडते मला..!
कुणास ठावूक तिचे माझे
काय नाते आहे?
माझ्या स्वप्नात तिचे
येणे... आवडते मला.

ती,मैञीअसते..!



राञी नंतर उगवते म्हणुन ती,
पहाट असते...
क्षितीजापासुन सुकतो म्हणुन तो,समुद्र असतो...
अंकुराशी जडते म्हणुन ते,
रोप असते...
वळणावळणाची असते म्हणुन ती,वाट असते...
मनामनाशी जडते म्हणुन ती,मैञीअसते..!
Sagar Chikhalekar

रोज आठवण येई!



कधी सांजवेळी
पापणीला पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या
दूर दूर नेई!

ओघळत्या थेंबांचे
नाजुकसे क्षण
एकेक थेंब
सारं सांगून जाई!

भिजलेल्या डोळ्यांनी
कातरवेळ टळून जाई
त्या वळणावर तुझी
रोज आठवण येई!

किनार्यावर वेचलेले
सुखद क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई!

तुझ्या माझ्या मैफिलीचा
एक नाद येई
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली
स्वप्नांचा
प्रिये , मज रोज भास होई
रोज भास होई!!
Sagar Chikhalekar

Monday, June 18, 2012

आता तीच्यावर कवीता

आता तीच्यावर कवीता
मला सुचतच नाही.

कारण ती मला आजकाल
दिसतच नाही.

सतत मी फक्त तीलाच
शोधत फिरत असतो.

पण ती दिसल्यावर तीला
... न पाहिल्या सारखे भासवतो.

असे मी का केलं म्हणुन
स्वतावरच रागावतो.

खरच तीच्यवर प्रेम
तर मी खुप करतो.

पण तीला हे सांगायला
पण खुप घाबरतो.

तरीही सांगायचा तिला
निर्धार करतो.

पण ती नाही बोलली
तर माझे काय? असाही
मी विचार करतो.

म्हणुनच थांबलोय मी
योग्य वेळेची वाट पाहत.

कढतोय प्रत्येक रात्र
तीच्या आठवणीत जागत.

आई

आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,
तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,
कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी
पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,
दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा
जरी मी मोटा झालो, तरी तुझामायेचा पदर हवा.

मला भीती वाटते..

नको करुस माझ्यावर इतके प्रेम,
प्रेमाची भीती वाटते..

नको येऊस जवळ माझ्या इतकी,
दुरावण्याची भीती वाटते..
तुझ्या प्रेमावर,
विश्वास आहे माझा..

पण ?????

माझ्या नशिबाचीचं,
मला भीती वाटते..

कोणी गेलं म्हणून...

कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवूनठेवायचं नसतं...
आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंतपो होचायचं असतं...
आभाळापर्यंत पोहोचता येतनसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...
कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
... दिवस तुझा नसेलही,रात्रतुझ ीच आहे.
त्या रात्रीला नवीनस्वप्नं मागायचं असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...
कोणी गेलं म्हणून...

बाबा

बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय,
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
जे असेल ते मी खाईन,
जसा ठेवाल तसा राहीन."
काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
... टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं,
अगदी तसं झालं.
एवढाच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो ,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो,
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती ,
पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा,
स्वताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा शिकवणारा बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.
मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं,
हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.
हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर,
पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.
लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.
आज माझंच मला कळून चुकलं.

प्रेम कर...

आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर
अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर
नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या
ओलाव्याने मोहरणार्‍या
मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर
... कळ्या उमलती तू हसतना
... स्पर्श छेडती कोमल ताना
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर
नको विचारू गतकालाला
करेन वश मी त्या दैवाला
माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर
घाव झेलले जगण्यासाठी
राखेमधुनी उठण्यासाठी
हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर
नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर
अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर...

मी म्हंटल

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी, तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग...
तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"
मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
... विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो, न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली पत्रीकेसोबत...
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ...
आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय...
@amol kalshetti...

ती असते कुठे

ती असते कुठे
ती दीसते कुठे
शोधत राही मन माझे
जीथे कधी होते
अस्तीत्व तीचे.

काही माहीत नाही
कुठे गायब झाली,
मला न सांगता अशी
ती कुठे गेली.
...
तीला वाटले तीचे प्रेम
मी जाणले नव्हते,
तीची ओढ पाहुन सुधा
प्रेम मला कळले नव्हते.
मला फक्त थोडा
वेळ हवा होता,
कारण माझ्यासाठी हा
खेळच नवा होता.

माझ्या नकळत असे
तुझे ते चोरुन पाहने,
पण माहीत नव्हते तुला
मी तुझा पाठलाग करने.

तु माझ्या अयुष्यात
नवी पहाट बनुन आलीस,
भर उन्हात मला
चींब भीजवुन गेलीस.

आता अशी माझ्यापासुन
दुर तु जावु नकोस,
पंख नसलेल्या पाखराचा
खेळ पाहू नकोस...

@sagar chikhalekar

बघ माझी आठवण येते का.....



बघ माझी आठवण येते का.....

ओल्या चिंम्ब पावसात

भिजताना
थेम्ब थेम्ब ते पावसाचे
हातावर झेलताना
भिजले केस तुझे हलुवार
पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

... कातरवेळी चालताना

एकटे एकटे असताना
एकटक कुठेतरी पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

आरशात निरखून बघताना

आपलच सुंदर रूप पाहून
लाजताना
लाजत लाजत हसताना
बघ माझी आठवण येते का.....

चांदराती फिरताना

अबोल संध्येशी बोलताना
तुटता तारा पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

नको त्या कारणावरुण

रुसताना
मुसू मुसू तू रडताना
डोळ्यातले अश्रु पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

संकटाना सामोरी जाताना

यशाची शिखरे गाठताना
मोकळी वाट चालताना
बघ माझी आठवण येते का.....

मनाला मन जोडताना

क्षण क्षण जगताना
प्रत्येक श्वास घेताना
बघ माझी आठवण येते का.....

बघ माझी आठवण येते

का....

Sagar Chikhalekar

कधी सांजवेळी



कधी सांजवेळी
पापणीला पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या
दूर दूर नेई!

ओघळत्या थेंबांचे

नाजुकसे क्षण
एकेक थेंब
सारं सांगून जाई!

... भिजलेल्या डोळ्यांनी

कातरवेळ टळून जाई
त्या वळणावर तुझी
रोज आठवण येई!

किनार्यावर वेचलेले

सुखद क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई!

तुझ्या माझ्या मैफिलीचा

एक नाद येई
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली

स्वप्नांचा
प्रिये , मज रोज भास होई
रोज भास होई!!
Sagar Chikhalekar

Saturday, June 9, 2012

असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....??

असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....??
तुझ्याच एका हास्यासाठी,माझे हसणे अडायचे...
तुझ्याच एका शब्दासाठी, माझे कान थांबायचे....
तुझ्याच एका श्वासाविणा माझे श्वास अडायचे....
पण असे का व्हायचे हे माझे मलाच नाही कळायचे....????
तुझ्याच एका भेटीसठी, मनोमन तरसायचे...
तुझ्याच एका स्पर्शासाठी शरीर, हे आसुसायचे...
तुला काही कळू नये असे जरी वाटायचे,तुझेच विचार
मनात गिरटया घालायचे.....
पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....???
तू नसणार हे जाणूनही भर गर्दित, मन तुलाच
शोधायचे.....
तुझे स्वर नसताना देखिल,कान तिकडेच वळायचे......
तु घरी नसताना देखिल ,पाउल तिकडेच वळायचे.......
पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....??? —

तुझ्याशिवाय जगताना,

तुझ्याशिवाय जगताना,
जगताना काय मरताना,
त्या रखरखत्या उन्हात तळपताना,
त्या विरहाच्या आगीत जळताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....
गर्दीत सुद्धा एकटा असताना,
तुझ्या सावली सोबत बोलताना,
तु नसताना तुझ्यावर प्रेम करताना,
तुझ्या आठवणीत स्वतःला विसरताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....
या वाटेवर अडखळताना,
तुला शोधण्यासाठी इकडे तिकडे पळताना,
आणि नाही सापडलीस कि सावरताना,
स्वतःचं मनाची समजुत काढताना,
एकदा तरी वळुन बघायचंस जाताना....
आता निरोप देतो ञासांना,
आता तोडतो स्वप्नांना,
आता तोडतो त्या नाजुक बंधनांना,
आणि आता मुक्त करतो श्वासांना,
आता एकदा तरी बघ मला जाताना.... —
Mayur....♥

प्रेम का करावे

हलकेच गालात ...
हसून तुझे पाहणे,..♥

डोळ्यातले तुझे
प्रेमळ ते पाहणे...♥

प्रेम का करावे
अन कुणावर करावे,..♥

प्रश्नाला माझ्या या
तुझ्या अदेने उत्तर द्यावे...♥

Sunday, May 13, 2012

येथे क्लिक करा

केदार भोपे : माझा नवीन ब्लॉग आहे हा तरी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती...
येथे क्लिक करा

Thursday, April 26, 2012

मन मोकळ करायचं असतं !!!

मलाही सारखं वाटत तुला फोन करावा ,
तुझा आवाज ऐकावा,
मनमोकळे पणाने तुझ्याशी बोलावे,
तुझी भरपूर थट्टा मस्करी करावी,
राग येईपर्यंत तुला चीडवाव,
आणि मग तू गाल फुगवून बसल्यावर
वेडेवाकडे चाळे करून तुझा राग घालवण्याचा प्रयन्त करायचा
मला अस बराच काही वाटत!!!
बरंच काही बोलायचं असतं तुझ्याशी !!!
तुला सगळ सांगायचं असतं .
मन मोकळ करायचं असतं !!!

मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही 
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..

तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..

मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..

तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..

मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..

मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?

मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....

मी कधीच विसणार नाही....
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....

तू आल्यानंतरही.

नाही जमणार आता ..
मला ते प्रेम वेगेरे ..
नाही जमणार आता
मला ते आवडणे वेगेरे ...
समज आता नाही उरले..
तसे काही नाते..
समज आता नाही राहिले ..
तसे काही बंध ...
पुन्हा पुन्हा नाही सहन
व्हायचे ते सोडून जाने ..
पुन्हा पुन्हा नाही आता
जमायचे ते तुला स्वीकारणे..
नाही तुला माज्या प्रेमाची कदर ..
नाही तुला माज्या यातनांची खबर ..
विसरण्याचा प्रयत्न करतो मी..
मनाला समजावतो मी...
रडता रडता मन हि म्हणते..
इट्स ओके ..
जाता जाता तू परत का येते..
इट्स नोट ओके ..
इट्स ओके कधीच नव्हते ..
तू गेल्यानंतरही ..
इट्स ओके कधीच होणार नाही..
तू आल्यानंतरही.

तुझ्या रंगात आता !!! —


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे

मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
तुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस

आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

“सणाला तरी हसत जा”
बाहेरच जग पाहत जा”

“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा”

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन !
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन
तुझ्या रंगात आता !!!
 —

चंद्र आणि मी........

चंद्र आणि मी........
मध्य रात्रीची वेळ होती, झोप येतच न्हवती
म्हणून खिडकी जवळ येऊन उभा राहिलो
तेव्हा आकाशातला चंद्राचा प्रकाश डोळ्यावर येऊन पडला
तारे त्याच्या भोवती लुक लुक करत जगमगत होते
मी चंद्राकडे टक लावून बगत होतो
तेव्हा चंद्राने विचारला काय रे काय बाग्तोस एवढा टक लावून
माझ्याकडे?
मी म्हणालो काही नाही रे असच
चंद्र परत म्हणाला काय काही नाही कोणाला शोधतोस सांगशील
का मला?
अरे तिला शोधतोय खूप आठवण येतेय तिची
कशी असेल काय माहिती माझ्या विना?
ए चंद्रा तू संग ना रे तू तर सर्वाना बगत असतोस आकाशा मदनं?
मी का सांगू तूच सांग ना खूप प्रेम करतोस ना तिच्यावर?
मग सांग काय करतेय ती?
असेल माझ्यासारखी तिच्या खिडकीपाशी आकाशात मला शोधत
आठवण काडून माझी रडत असेल, डोळ्यातले अश्रू थांबता थांबत
नसतील
खूप प्रेम करते ना माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त, नाही राहू शकत
माझ्या विना
चंद्र म्हणाला कसा रे एवढं सर्व ओळखलस तिला न
बगता आणि तिच्या जवळ नसताना?
अरे मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर आणि माझं मन मला सांगतंय
ती खूप त्रासात आहे ते
मी चंद्राला बोललो तू करशील का रे मदत माझी, देवाला सांगशील
का आमच्या बदल
तू तर देवाच्या एकदम जवळ आहेस
सांग ना रे देवाला आमची मदत करायला
आम्हाला परत एकत्र आणायला, सांगशील ना रे?
चंद्र बोलला सांगीन ना कारण मला सुधा वाटतय तुम्ही एकत्र यावं
मी नक्की सांगीन कारण अशे खरे प्रेम करणारे खूप कमीच असतात
या जगात
तुमचं प्रेम जणू निराळच आणि जगावेगळच आहे
तुम्ही दोघं एवढं मनाने जुळले आहात की दूर राहून सर्व
एकमेकांना ओळखतात
खरच तुमचं प्रेम अप्रतिम आहे
कदाचित देव तुमच्या प्रेमाची परीक्षाही घेत असेल,
पण तुमचं प्रेम बघून देव तुम्हाला नक्की एकत्र आणेल
तो बगत असेल तुम्ही दूर राहून सुधा एकमेकांवर तेवढच प्रेम कराल
का?
मी चंद्राला बोललो, ही कसली परीक्षा ज्यात अश्रू आणि दुखच
जास्त
एवढा त्रास सहन करावा लागतोय बघतोस ना चंद्रा तू
आणि मला दुखात नाही बगायचं आहे रे तिला
तिच्या आयुष्यात का कमी दुख आहे की आजून हा त्रास सहन
करायचा तिने
माझ्यासाठी नाही निदान तिच्या खुशीसाठी तरी एकत्र आन आम्हाला
तिला खुश बगायचं आहे नेहमी आणि ते माज्या विना मुमकीन
नाही आहे रे
चंद्र बोलला मला कळतंय रे सर्व आणि मी तुझा निरोप नक्की देईन
देवाला
तू काळजी करू नकोस सर्व ठीक होईल
चल जा आता झोप तू खूप उशीर झालाय आणि ती पण झोपली आता
तू पण झोप आणि मी पण थोडा आराम करतो असा म्हणत चंद्र पण
ढगा आड लपून गेला
तारे पण लुक लुक करून कुठे गायब झाले कळलच नाही
चंद्राशी बोलून मन हलकं झाल्यासारखं वाटलं
नंतर मी सुधा खिडकी बंद करून झोपी गेलो. ...

तु

तु माझ्या जीवनात आलीस पण .
मी तुझ्या जीवनात नहव्तो.
तु माझ्या हृदयात जाऊन बसलीस पण मी तुझ्या चपलीच्या......पायाशी होतो .
नंतर खूप शोधलं तुला ह्या शरीरात ...........
पण भेटलीस माझ्या हृदयात
नंतर तुला समजल कि कोणी तरी आपल्यावर खूप प्रेम करतंय ......
शेवटी मी तुझा नाही झालो म्हणून काय झाल
शेवटी देवाचा मी झालो ...........................
_ म्हणून सांगतो जर समोर चा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो
तर ते प्रेम होत नाही तर त्याचा अनर्थ होतो .............

Wednesday, February 22, 2012

तु शिकवून गेलीस बरंच काही तु शिकवून गेलीस बरंच काही

तु शिकवून गेलीस बरंच काही
आणि,

जातांना सोडून गेलीस
माझ्या हातात दोन ओळी..
त्या ओळींचा अर्थ उमगेपर्यंत
तु बरीच दूर निघून गेली होतीस..
मी हाक दिली तुला,

पण
तुझ्यापर्यंत कदाचीत ती पोहोचलीच नाही
मीच ओळखायला घेतला जास्त वेळ..
तुझ्या मनाचं..
आता त्या दोन ओळींशिवाय हातात उरलेला फक्त स्पर्शच तुझा
आणि मनात कायमच्या गोंदल्या गेलेल्या
काही आठवणी..
विसरून जायची सवयच लावून घ्यायला हवी आता
नाहीतर त्या दोन ओळी..
काट्यासारख्या सलत रहाणार..
आयुष्यभर
तू दोनच ओळीत समावून टाकलं..

तुझ्या मनाच सार गुज
आणि मी मात्र शेवटपर्यंत शब्दच राहिलो शोधत.

मी बोलतच नाही

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील...
.................................

सहजच...

सहजच... ती आपल्याला भेटते ...
सहजच... आपली वाटू लागते ...
सहजच... आपण गहिवरतो ...
सहजच... आपल्यातून हरवतो ...
सहजच... आपण तिचे होतो...
सहजच... तिला प्रेमाचा प्रत्यय येतो...
सहजच... ती आवेगाने बिलगते ...
सहजच... हृदय सर्वार्थाने बहरते ...
सहजच... आपण वहावत जातो ...
सहजच... स्वत:पासून दुरावत जातो ...
सहजच... ती एक आठवण होते ...
सहजच... आपल्याला याची सवय होते ...
सहजच... पापणी ओलावते...
सहजच... एकांतास खुणावते ...
सहजच... अगदी सहजच आपल्यासोबत असे होते...
सहजच... उमललेले प्रेम क्षणार्धात 'निर्माल्य ' होते ... !!!

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

मी आहे हा असा आहे,

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर नीघून जा...
पुरणपोळी चाख्रतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.
हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.
शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.
अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.
प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"
कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.
प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.
" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....
सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर...

तू गेल्यावर...
शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात....!!

तू गेल्यावर....
मजा मी एकटा
गप्प बसून राहतो
तू येणार्‍या क्षणांची
आतूरतेने वाट पाहतो....!!
तू गेल्यावर....
आजही आठवते मला
तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर
चांदण्याना वाटते जशी अमावस.....!!

तू गेल्यावर....
आता फक्त मी
शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन
कविता करत राहतो....!!

तू गेल्यावर.....
आता मज मला
राहत नाही स्मरण
इतका अभागीतुझ्याशिवा य मी
वाट पाहता तुझी येतही नाही मरण....!!

Wednesday, February 15, 2012

काय झाले मला, माझ्ये मलाच कळत नाही,

काय झाले मला,
माझ्ये मलाच कळत नाही,
कविता करायला गेले,
तर मला कविताच सुचत नाही
काहीतरी लिहीन म्हणते,
तर शब्दांकडे मनच वळत नाही,
अचानक कसे असे झाले,
माझ्ये मलाच कळत नाही.
इतके दिवस झाले
माझी कविता वाचण्यात आली नाही,
काय सांगू मी तुम्हाला,
मी कविताच केली नाही.
शब्दांचा मांडणीला आता,
मन माझे जागेवर नाही,
काय करता सुवर्णा बाई...!!
तुम्ही प्रेमात तर पडला नाही.....??
पण कसे शक्य आहे,
मला कधी कोण आवडलेच नाही,
प्रेमात पडायला मी कधी,
त्या रस्त्याकडे वळलेच नाही,
तरी देखील अचानक,
असे का हे घडले,
कविता करण्यासाठी,
मला शब्दच अपुरे पडले..

ख़रच ...... हिला वेड लागलय ....

दूर कुठे तरी हरावाल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकलतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलान्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ....... हिला वेड लागलय ....
आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ....... हिला वेड लागलय .....

तुझ्यापेक्षा मला तिचीच ज्यास्त आवड

तुझ्यापेक्षा मला तिचीच ज्यास्त आवड
केव्हाही असते तिला माझ्यासाठी सवड
तिच्याकडे नसतात तुझ्यासारखे बहाणे
उशिराने येणे आणि लवकर निघून जाणे
कितीही सांगितलं तरी ती लांब जात नाही
आमच्या दोघामधल अंतर वाढू देत नाही
तिच्या टपोऱ्या डोळ्यातून ओघळला मोती
अलगद त्यान तो टिपला आपल्या हाती
म्हणाला हळूच तिचा हात हातात घेऊन
अग वेडे तूच तर जातेस तिला मागे ठेऊन
तू नसतेस जवळ पण असते तुझी आठवण
तुझ्या विना कसा काढू सांग न एक क्षण?
हे ऐकताच मात्र ती प्रेमाने त्याला बिलगली
अन ओठांची पाकळी हि नकळत विलगली!!!!!!!!!!!!!

तू गेल्यावर...I Miss You So Much Sweetheart [:(]

तू गेल्यावर...I Miss You So Much Sweetheart [:(]
तू गेल्यावर...
शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात....!!
तू गेल्यावर....
मजा मी एकटा
गप्प बसून राहतो
तू येणार्‍या क्षणांची
आतूरतेने वाट पाहतो....!!
तू गेल्यावर....
आजही आठवते मला
तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर
चांदण्याना वाटते जशी अमावस.....!!
तू गेल्यावर....
आता फक्त मी
शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन
कविता करत राहतो....!!
तू गेल्यावर.....
आता मज मला
राहत नाही स्मरण
इतका अभागीतुझ्याशिवाय मी
वाट पाहता तुझी येतही नाही मरण....!!

तुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं

तुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं,
मी समोरुन जाताना
तु दारात उभं रहायचं
आईला संशय नको म्हणुन
झाडानां पाणी घालायचं,
फुलानां फुलवायचं,
आईला भुलवायचं
तुला वेळ मिळाला तर...
को~या कागदावर्,
किवा रुमालावर
मन मोकळ करायचं
अस् एकमेकांनी
काळजात जपायचं
तुला वेळ मिळाला तर...
कळेल एक दिवस तुझ्या घरी
कळेल एक दिवस माझ्या घरी
तेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाची
दोघांत एक विषाची बाटली
तु आधी कि, मी आधी
असं नाही भांडायचं
दोघांनी एक-एक घोट घ्यायचं
हातात हात घेउन झोपी जायायचं
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.

लव्ह

आयुष्याच्या वळणावर कधी लव्ह होवून
जाते काही कळतच नाही.
कधी काय घडून गेल काहीच उमगत नाही.
जणू कळीच्या रुपात तीच येण,
अन फुल उधळत जाण.
होकार कि नकारच्या भीतीने,
मनातला वसंत बहार मनातच दडून राहण.
आज विचारू... आज विचारू ...
म्हणत दिवसामागून दिवस जाई.
विचारण्याच्या भानगडीत भलतच घडू नये.
म्हणून आजच उद्यावर विचारणं जाई.
वर वरल जगन निराळच होवून जात.
पण आतमधला अबोलपणा तसाच.
मीही जाणून तीही जाणून.
पण दोघांमधी संकोचाच धुख आड आल.
अन लव्ह कधी होवून गेल काही कळलच
नाही.

माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे

माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे
म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फ़िदा आहे
तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील
स्कार्फ़ तू लपेटून घे
नसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे
मी जेव्हा फ़ोन करीन धावत-धावत भेटायला ये
होत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर
टपरीवरचा फ़क्कड चहाच घे
वाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे
फ़ुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे
असेच प्रेम करु जन्मभर ...
पण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा
पाहून नोकरी तू शोधून घे
यामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे
पण माझ तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे
म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फ़िदा आहे.

तरी माझं मन वेडं काही भरतच नाही.

मी : तुझ्या माझ्या प्रेमाला तशी...
खास दिवसाची काही गरजच नाही,
पण कितीही केलं प्रेम तुझ्यावर....
तरी माझं मन वेडं काही भरतच नाही.
ती: गप्प राहायचं तू....आज फक्त माझं ऐकायचं...
माझं जास्त प्रेम कि तुझं जास्त प्रेम नंतर तूच ठरवायचं....
डोळ्यात माझ्या आपल्या दोघांचं स्वप्नांचं गाव,
माझ्या चांदण्यावर फक्त एक तुझंच नाव,
खांद्यावर तुझ्या डोकं ठेवलं ना कि..मी काही माझी राहतच नाही,
नसलास ना तू की ते चांदणं मी पाहतच नाही...
काय वाटतं मला तुझ्याबद्दल...
सांगायला मला शब्द काही पुरतच नाही
इतकंच कळतंय मला....तुला वगळलं तर...
जगण्यासारखं माझ्याकडे काही उरतच नाही
सांग ना रे,आता तुझं प्रेम जास्त की माझं प्रेम जास्त....???
तुझ्याशिवाय जग सगळं मला वाळवंटासारखं भासतं...

मी : निघता निघता मी हिशोबाची वही काढली....
तू इतकं काही दिलंस आज,माझी ह्या क्षणांवरती वाढली....
Happy Valentines Day..... ♥♥

तिची साथ अशी,

तिची साथ अशी,
जशी नदी आणि नदीचा किनारा
नभातुन पडणा-या पावसाच्या धारा...
तिचं दिसण अस,
जसा आकाशी चमकावा एक तारा
ज्याला पाहून दीवाना होतो निसर्ग सारा..
तीच हसण असं,
माझ जीवन फूलवणार
मला तिच्या आनंदातच वेडं करणार...
तीच लाजणं असं,
मला काहीतरी आठवून देणार
नजरेच्या ईशा-यातच सगळंकाही सांगणार...
तीच चालणं
लोकांची नजर फिरवणारं
आणि माझ्या तर ह्रुदयातच सरळ छेद करणार...!!! :)

◘aBhI◘

माझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...

पाहताच तुला,हरवून गेलो ग मी तुझ्यात...
जीव अडकला ग माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात..
डोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस..
हृदयात हि माझ्या, आता फक्त तूच राहतेस,
स्वप्नात हि मला आता रोज भेटतेस,
अन खरोखर तू समोर येताच,
फक्त एक स्वप्न म्हणून वाटतेस...
काय करू ग मी ?
कस सांगू ग तुला?
खरोखर खूप प्रेम करतो ग तुझ्यावर,
म्हणून तर काय?
क्षणो- क्षणी आता मला, फक्त तूच भासतेस,
अन,
माझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...

आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,

माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू ….
तुझ्याविना आनंदातही मौज नाही ,
कोट्यावधी सुखातही रस नाही ,
माझ्या उदासीन ओठावरचे ‘ स्मितहास्य ‘ तू ….
मदतीने तुझ्या सारी कोडी सोडविली ,
तू साथ नसताना मिळालेली उत्तरेही चुकली ,
माझा गमावलेला दृढ ‘ आत्मविश्वास ‘ तू ….
अपयशी ठरे यशस्वी शिखर तुझ्याविना ,
पराजित वाटे हर अजिंक्य सामना ,
माझ्या यशाची खरी ‘ प्रेरणा ‘ तू …
तुझ्या डोळ्यांच्या प्रतीबिंबात हे सौंदर्य खुलले होते ,
सजली हिरेमोती पण प्रशंसणारे कोणीच नव्हते ,
माझ्या हृदयाचा ‘ आरसा ‘ तू ….
आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,
हर एक क्षण जागचा जागीच थांबला ,
माझा एकांतातील ‘ सहवास ‘ तू ….
प्रत्येक कंपनात तुझेच नाव होते ,
कोरे मन अजूनही तुझीच वाट पाहते ,
माझ्या श्वासाची ‘ आत्मा ‘ तू ….
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू …..

जीवन

जीवन ही खरी कसोटी आहे मागे वळून पाहू
नकोस!
येईल कोणी तारावया म्हणून वाट
कोणाची पाहू नकोस!
हे सारं जग जिंकायचं आहे हार कधी मानू
नकोस!
यश फक्त तुझ्याचवळच आहे
जिँकल्याशिवाय थांबू नकोस!!!!!

प्रेमाचा हा रंग नवा...

प्रेमाचा हा रंग नवा...
मला तुझ्या ओठांवरचा रंग हवा..
श्वास तुझ्या श्वासांमध्ये दंग हवा..
मुकं मुकं जग नको आज मला
आज साजणे शब्दांचा संग हवा..
नको एकटे ते जगणे कधीही
बंध प्रिये दोघांचा अभंग हवा..
सुटे न कोडे जीवनाचे मला
उठवू नकोस प्रश्नांचा वादंग नवा
वेचलेस काटे आज तु फुलांचे
मला तुझ्या प्रेमाचा हा रंग नवा...

Monday, February 13, 2012

एक झुळुक प्रेमाची

एक झुळुक प्रेमाची जणु स्पर्शित हलकीशी
गवसली ती मजला एके दिवशी
मोहक त्या दिवसानंतर जग हे सारे माझे पालटून गेले
अचानक मनास उमजून आले
ती झुळुक फक्त क्षणभराची
फक्त फक्त मनाला थिजविणारी
सदैव राहो आठव अशी ती आयुष्यभरासाठी
ती आठव जपुन मनात
नेईन मी ही आयुष्याची पोचपावती
भेटेल का ती झुळुक पुन्हा
कुण्या एका अनोळखी वळणावरती
हूर हुर असे मनास माझ्या
जेव्हा केव्हा येईल ती झुळुक पुन्हा
असेल का ती फक्त माझ्यासाठी
अशीच ती झुळुक प्रेमाची स्पर्शित हलकीशी

वेळच गेली निघून ....................

प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................
...
जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

गाठभेट.....

गाठभेट.....
=========================
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?
आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण
आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा...,
एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,
नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......!

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

मी त्याचीच होती पण.....!!!

मी त्याचीच होती पण.....!!!
======================
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......

Tuesday, February 7, 2012

तू सोडून गेल्यावर...

तू सोडून गेल्यावर...
तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...
माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....

मी आहे जरा असा...

मी आहे जरा असा...
मी आहे जरा असा
एक्टा एक्टा राह्नारा,
माझे प्रेम् शबदानी नव्हे
तर् डोळयानी व्यक्त करनारा.
मी आहे जरा असा
एकटा एकटा राह्नारा,
कुनाचे चार् शब्द प्रेमाचे ऐकुन्
त्याचायवर् वीस्वास ठेवनार.
मी आहे जरा असा
एक्टा एक्टा राह्नारा,
कुनीही दुखात दीसल् की
त्याचे दुख् वाट्नारा.
मी आहे जरा असा
एक्टा एक्टा राह्नारा,
वादळात सुदधा
एकटा बसनारा.
मी आहे जरा असा
एक्टा एक्टा राह्नारा,
प्रेयसी बरोबर् असताना सुदधा
तीच्या वीचारात मग्न् राहनार.
मी आहे जरा असा
एक्टा एक्टा राह्नारा......
"I'll wait"

आज परत एकदा तिला पहावस वाटतय,

आज मला खूप एकट वाटतय,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....

आज परत एकदा तिला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,
तिचा हात परत माझ्या हातात घेऊन, थोडा चालावस वाटतय,
अन परत एकदा तिला लाजताना बघावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
तिच्याच आठवणींत जगावस वाटतय.... :(
फक्त तिच्याच आठवणींत जगावस वाटतय.... :(

ह्रषिकेश व्हटकर.... :'( @>`~~~

Sunday, February 5, 2012

तिथून पुढे- सलील वाघ

तिला पाहता असे वाटले

तिला पाहता असे वाटले
वसंतात ही बहरली फ़ुले...
निळे सावळे मेघ तसे तिचे डोळे भासले
आभाळासारखी तिच्या गालांची रंगसंगती
घन रात्रीचे काजळ जणू केसात गुंतले
तिला पाहता असे वाटले........
गंध फ़ुलांचा असावा असा दरवळे तिचा श्वास
वार्‍यापरी चहुकडे तिचाच पसरे भास
झुळझुळणारा झरा तसे तिचे पैजण छनछनले
तिला पाहता असे वाटले.........
चंद्राचे तेज गोंदले तिने जसे कपाळी अन
तिच्या गालावरी खळी जशी वेलीवरचीच कळी
रंग फ़ुलांचे तिच्या ओठावरी रंगले
तिला पाहता असे वाटले........

घडी..

हि सुखाची घडी, वाटे फुलांची लडी,
श्वास श्वासांत उसळे रोमाचांची सरी.
हि नवी सांज अण चंद्रकोर नविशी,
हि नवी स्व्पनेही वाटती हवीशी.
ना कुणी भोवती, तरी भास भांबावती,
कि कुणी ऐकतो, जे मी बोलते स्वतःशी.
जागेपणी स्वप्न हे वाटते नकोसे,
हृदयात का हे वाढती उसासे,
आणि का अचानक फडफडे पापणी.
हा ध्यास कोणता घेतला मनाने,
जुने स्वप्न पुन्हा उलगडे नव्याने.
का पुन्हा जागे ओढ, त्या जुन्या वाटेची,
वाटते गुणगुणावे ते जुने तराने.
हलके भासे शरीर कापसाप्रमाणे,
उडण्याचे होती भास, नभ वाटती ठेंगणे.
पण तरी अंतरी, वाटते का भीती,
होतील का हि पुरी स्वप्ने जी भाबडी.

काय करू ग मी ?

पाहताच तुला,हरवून गेलो ग मी तुझ्यात...
जीव अडकला ग माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात..
डोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस..
हृदयात हि माझ्या, आता फक्त तूच राहतेस,
स्वप्नात हि मला आता रोज भेटतेस,
अन खरोखर तू समोर येताच,
फक्त एक स्वप्न म्हणून वाटतेस...
काय करू ग मी ?
कस सांगू ग तुला?
खरोखर खूप प्रेम करतो ग तुझ्यावर,
म्हणून तर काय?
क्षणो- क्षणी आता मला, फक्त तूच भासतेस,
अन,
माझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी ---------

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी ---------
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
मी अस्वस्थ, तू गाफील,
माझ्या मनाची सतार, तुझी हुकमी मेहफिल,
त्यातच एक तार, झंकारते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....
आभाळातल्या चंद्रला लाटांची ओढ,
तुजवीण अपुरी मज कवितेची ओंळ,
मी कण कण संपताना.. पुन्हा घडते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तुझ्याविना…… आई ….

तुझ्याविना…… आई ….
वात्सल्य करूणा माया ममता,
ह्र्दयात भरली ठाई ठाई,
त्यागास त्या तव लेकरांस्तव,
वर्णावयास योग्य शब्द नाही!
तव कष्टास त्या सीमा नव्ह्ती,
संकटांची मालिका ती भवती,हसतमुखी गाईली अंगाई,
कसे ग आम्ही होऊ उतराई!
सुसंस्काराची ती दिली शिदोरी,
स्वाभिमानाची बळकट दोरी,
आशिर्वाद अन तुझी पुण्याई,
चाललो आड्वाट-वनराई!
जात्यावरली ती ओवी आठवे,
स्वाभिमानाची ती ज्योत आठवे,
आहे येथेच भास असा होई,
तुझ्याविना हे व्यर्थ जीणे आई!

"अनुभव"

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत
जाते,
प्रश्न कधी कधी
कळत नाहीत
आणि उत्तर चुकत
जाते,
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता,
पण
प्रत्येक वेळी
नवीन गाठ
बनत जाते,
दाखविणाऱ्याला
वाट माहीत नसते,
चालणाऱ्याचे ध्येय
मात्र हरवून
जाते,
दिसतात तितक्या
सोप्या नसतात
काही गोष्टी,
"अनुभव"
म्हणजे काय
हे तेव्हाच कळते,

Saturday, February 4, 2012

कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही.

हसता हसता डोळे अलगद येतील हि भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावर होण्यासारख बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय,बाकी काहीनाही.
रस्त्यामध्ये दिसतातच कि चेहेरे येता जाता
*एका*सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टी मध्ये दोनच जीव.....आणखी कुणीच नसेल,
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही
मोबाईल वाजण्या आधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून SMS वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुदा श्वास
घाबरून बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय,बाकी काही नाही
जेवताजेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहेरा लपवत,डोळे पुसत,पाणी प्यावे थोडे
बोलण्या आधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगून द्याव काळजी सारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही.

प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी,

प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी,

ते एक मन ज्याला दगड बनवले मी..

कधी कोणी दुःखवु नये तुला माझ्यामुळे,

म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी..

ज्या आसवांनी या रात्रीनां जागवले मी,

ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी..

पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत,

म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी..

तुझ्यानतंर विनाकारण या देहाला जगवले
मी,

आता हो स्वःताच्या हाकेने मृत्युला बोलावले मी..

उगाचं तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही,

म्हणुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी..

तुझ्या विरहांत उगाचचं शब्दांना सतवले
मी,

तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी..

तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजावं लागतं,

म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी..
.

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?
वैशाखाच्या पलंगावरी वसंताची उशी रे...
रणरणत्या उन्हामध्ये झुळूक गार जशी रे...
कुडकुडत्या थंडीत जणू विस्तवाची कुशी रे...
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

काया तिची सावळ सुंदर... मखमाली मोरपिशी रे...
रूप तीच निहाळताना लाजतो पहा शशी रे...
मन तीच गगनचुंबी... त्यात आभाळाएवढी ख़ुशी रे...
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

भोवती तिच्या प्रेमाची... तलम,नाजूक कोशी रे...
मन होई सुरुवंट... तिच्या ओढीची मदहोशी रे...
शमवी तहान दृष्टीसवे... ती शीतल सरिता तशी रे...
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

जीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल

Friday, February 3, 2012

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज
जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

मी अस्वस्थ, तू गाफील,
माझ्या मनाची सतार, तुझी हुकमी मेहफिल,
त्यातच एक तार, झंकारते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....

आभाळातल्या चंद्रला लाटांची ओढ,
तुजवीण अपुरी मज कवितेची ओंळ,
मी कण कण संपताना..

पुन्हा घडते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा || धृ ||

मी आनंदाने हसतो
मी आनंदाने झुरतो
मी आनंदाने जगतो
मी आनंदाने रडतो

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा || १ ||

मी कायम हसत असतो
मी कायम रडत असतो
मी कायम सुख नि दु:ख
सोबत ठेवत असतो

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा || २ ||

मला सुख म्हणजे माहित नाही
आणि दु:ख कळत नाही
मी समाधानावाचून दुसरं
कधी काहीच शोधलं नाही

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा || ३ ||

मी थोडा हट्टी आहे
मी थोडा खट्याळ आहे
मी थोडा रागीट आहे
आणि बराच प्रेमळ आहे

मी स्वप्नांचा राजा, माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा || ४ ||

फरक कुठे पडला आहे….

फरक कुठे पडला आहे….

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

का कधीकधी असं जगावं लागतं?

का कधीकधी असं जगावं लागतं?

दुखाचे वादळ मनात असूनही
चेहऱ्यावर मात्र हसू ठेवावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?

कुणा व्यक्तीवर इतकं प्रेम करूनही
तिला दूर जाताना पहावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?

कितीही थकले पाय तरी
पुन्हा नवीन वाटेवर चालावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं?

आठवणीत हरवलेल्या क्षणांसाठी
स्वतःचच अस्तित्व हारवेल वाटतं
का कधीकधी असं जगावं लागतं?

शेवटाच्या भीतीने आयुष्याच्या
जगण्याचेच सुख गमवावं लागतं
का कधीकधी असं जगावं लागतं ?

सांग ना......
का कधीकधी असं जगावं लागतं ?

असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...!

असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...!
मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे सध्या? मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला, पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता. मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती, न सांगता एकमेकांच्य ा मनातलं ओळखणारे, असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासार खं...
पण असं काहीतरी घडलं, आणि....... ......... आता कशी असेल ती? कुठे असेल ती? असे अनेकानेक प्रश्न डोक्‍यात येत राहीले... आपणच सांगितलेलं तिला कि, नेहमी तुझ्या सोबत असेन, पण ती गोष्ट आपणच विसरलो... मग तिच्या घरी सहजच फोन केला, कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला? खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं, विचारलं मग, कसे आहेत सगळे? थोडं थांबून मग उत्तर आलं, कि सगळे ठीक आहेत..., माझी मैत्रीण काय म्हणते? ती आता काय बोलणार? आणि ती काही बोलू शकते का आता? थोड्या शांततेनं मग मी विचारलं... असं का म्हणताय? अरे, ती काही बोलायला, ती या जगात असायला तरी पाहिजे ना? तुझी खूप रे वाट पाहिली तिनं, अगदी शेवटच्या क्षणापर्यं त, पण तू मात्र आला नाहीस.... तिला काहीतरी झालं होतं... मी फक्त ऐकतच राहिलो, शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते, अश्रू मात्र भळाभळा वाहत होते.... मग आवाज आला, ऐकतोयस ना!!! तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला.. . आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय, ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल, आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे... तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा, आणि मी फोन ठेवला.... तिनं घरीही सांगून ठेवलेलं, मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार, म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठी च......... !!! मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो... Her चिट्टी - खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती, कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता, पण तू नाही आलास, मग विचार केला, तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं, मला खात्री होती, तू हे नक्की वाचशील..!! !!.. या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही...... . पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे..?????

एक दगडाचं मन दे..

आजवर काही मागीतलं नाही देवा,
पण आज एक वर दे..
हात जोडून मागतो देवा,
एक दगडाचं मन दे..
हजार वार झाले,
आज या काळजावर..
जवळचीचं सोडून गेली,
अनोळखी वळणावर..
नाती जशी तुचं देतोस,
त्यांना थोड आयुष्यदे..
हात जोडून मागतो देवा,
एक दगडाचं मन दे..
आठवण जवळ राहते,
तीच्या आनखीण काही नाही..
सावली सारखी पाठलाग
करते,
आनखीण काही नाही..
दिलास आता दुरावा तसेचं,
सहनशीलतेचं बळ दे..
हात जोडून मागतो देवा,
एक दगडाचं मन दे..
एकांताला आपलं मानतो,
आता मला कुणीचं नको..
मीचं स्वःताची समजूत घालतो,
आता दुस-याला त्रास नको..
पण जीने दिलं दु:ख मला,
तीला भर-भरुन सुःख दे..
हात जोडून मागतो देवा,
एक दगडाचं मन दे..
ती दुर आहे खुप माझ्या,
तरी का ही ओढ आहे ?
सुःखात असेल ती माझ्यावीना,
हीचं जानिव गोड आहे..
तीच्या जीवनात आनंद,
आणि हवं तर मला दु:ख दे..
हात जोडून मागतो देवा,
एक दगडाचं मन दे..
.

म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते... झाली होती गर्दी फार

तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते... झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
... काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला... आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते... राख़ अजूनही गरम होती
''उद्या वाहू''म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले .... मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं... आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ... नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ... नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...

Source - Vilas waghe

तूच एक असशील ना ?

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
...
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..... .....
तूच एक असशील ना ?

घरापासून दूर

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस् तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात , मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्य ा चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरत ी उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून , कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठ ी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागच ा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवा य,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासा रखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याच ं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशि वाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिव ाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी , आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाच ं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

सुरमई- किरण येले

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात

GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

आपल्या मनाचा आरसा...

दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...
दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

वाटले माझे मला जे, माझे न आता राहिले

चाललो वाटा अनेक, कधी सरळ कधी बिकट
नियतीचे झेलीत हास्य, कधी स्मित कधी विकट

जमून आले काही कधी, कधी सारेच बिघडले
काय हरवले काय गवसले, हिशोब ना परी मांडले

कधी तरंगलो कधी बुडालो, उसळुनी पुन्हा पुढे निघालो
जलौघातल्या कणासारखे, सहजस्वभावे सततच जगलो

बंधनापासून साऱ्या, मुक्त होती जिंदगी
सौख्य कलंदर आयुष्याचे, देत होती जिंदगी

भेटलीस तू अन, मीच मजला विसरलो
नकळत सारे होवून गेले, तुझ्यात पुरता गुंतलो

बदलूनी गेले विश्वची माझे, दिलेस किती तू नवे ऋतू
मन हे माझे म्हणे स्वतःशी, माझीच तू माझीच तू

वाटे जगणे तुझ्याचसाठी, तूच सोबती सदा असावे
दूर सारुनी भिन्नपणाला, एकरूप ते होवून जावे

एकरूप पूर्ण होण्या, बंधनात लौकिक बांधलो
जी तुझी तीच माझी, एक वाट चाललो

चालताना परी पुढे, विस्तारत गेल्या दिशा
नित्य नव्या मृगजळाच्या, मनी जागवीत आशा

दूर सोनेरी झळाळी, मृगजळाची आस लागली
हात सावरते अव्हेरणारी, धाव तुझी अंध झाली

धावताना बंध सारे, सहज तू ओलांडले
वाटले माझे मला जे, माझे न आता राहिले

फोलपणावर बंधनांच्या, हासून पुढे मी चाललो
ते कधी नव्हतेच माझे, मानून पुढे मी चाललो

------------- उत्कर्ष

तडकलेच जर ह्रुदय कधी

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

पण.........
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीचनसावे

आज सकाळी तुला पाहूनी

आज सकाळी तुला पाहूनी
मन माझे विरघळले आतुनी
ओघळले मोत्यासंम पाणी
तव ओलेत्या केसांमधुनि ...

नेत्रा मधले काजळ सुद्धा
हळूच हसले सलज्जतेने
तुझ्या मनातील भावच त्याने
संगितले जणू आत्मीयतेने ...

थवा फुलांचा दारी आला
तुला भेटण्या आतुर झाला
घमघमणारा सुगंधही मग
फुलांसावे त्या फितूर झाला ...

अंबरही मग झुकले खाली
पाहून तुझी ही नेत्रपल्लवी
वटलेल्या खोडास अचानक
फुटली ग नाजूक पालवी ...

तुला पाहूनी रवि-किरणांनी
दिधली होती शीतल छाया
ते ही बिचारे पाघळले ग
पाहून तुझी ही नाजूक काया ...

तुला पाहूनी वाटत होते
या क्षणी तरी कुठे न जावे
तुझ्याच नेत्रा मध्ये हरवून
तुझ्याकडे ग पाहत रहावे ...

नकोच मज़ला दुसरे काही
सखे, तुझी ग साथ हवी
आयुष्याच्या वाटेवरती
तव प्रेमाची हाक हवी...

प्रेम शिलक्क राहिले

काळीज चीरलेस माझे,
शब्दांचे केलेस वार
आले डोळ्यात अश्रू ..
ना सोसावले मज वार
ओतुनी रक्त माझे..
तुजसाठी गायिले मी गीत ..
न कळली आज तुला..
माझ्या हृदयातली प्रीत..
एकाकी जीव माझा ..
त्या एकटीत गुंतला..
आज जणू विषारी काटा..
हृदयामध्ये खोल रुतला
सांडले रक्त ह्रदयी..
प्रेम शिलक्क राहिले
मात्र हृदय आज माझे
धडधडन्यास कायमचे विसरले

असे हे प्रेम असते...

न सांगता कळणारे, अन कळून हि न


सांगता येणारे...


असे हे प्रेम असते...


डोळ्यात नेहमी दिसणारे,पण


वाचता न येणारे...


असे हे प्रेम असते...

काळजीतून कळणारे,पण कळूनही न

वळणारे...

असे हे प्रेम असते...

कधी कधी बोलून हि न

मिळणारे,अन कधी कधी न

बोलतास आपलेसे करणारे...

असे हे प्रेम असते...

जीवाला जीव लावणारे,अन

कधी कधी जीवासाठी जीव

हि देणारे..

असे हे प्रेम असते...