Tuesday, January 17, 2012

सकाळी सकाळी .......

सकाळी सकाळी .......



तिला पाहिले रे सकाळी सकाळी,


'दिला' जाळले रे सकाळी सकाळी |




तिच्या लोचनांनी मला भाळले रे


तिने टाळले रे सकाळी सकाळी ||

...



तिच्या दर्शनाने असा धन्य झालो,

तिचा भक्त झालो सकाळी सकाळी |

असा गुंतताना तिच्या भावरंगी,

जगी मुक्त झालो सकाळी सकाळी ||


...

तिचे केस ओले असा फास झाले,

अदांनीच मेलो सकाळी सकाळी |

तिला पाहताना, तिने पाहिले अन,


उगा चोर झालो सकाळी सकाळी ||


- रमेश ठोंबरे

|| प्रियेचे श्लोक ||

No comments:

Post a Comment