Friday, January 20, 2012

हे अस्स्सचं का होतं....!!

हे अस्स्सचं का होतं....!!

हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं..

भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ
परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ..

Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range
1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change....

दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी'
Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'....

5 रु . चा समोसा Multiplex मध्ये का होतो रुपये वीस
Important कामाच्या वेळी फास्ट लोकल का बरे होते मिस्स्स....

पावसाळा आहे माहीत असून, पाऊस आल्यावर का येते चीड..?
योगायोगाने एखादी पोरगी आवडलीच तर असते ती 'Just Married'

समजत नाही हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटचं का घडतं..!!!
*Author Unknown*

No comments:

Post a Comment