Thursday, January 19, 2012

संपलो नाही कधीचं मी पुरून उरलो होतो,

संपलो नाही कधीचं मी पुरून उरलो होतो,

विझलो नाही पुन्हा मी विझुन पेटलो होतो..

तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा,

त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो..

तुला वाटले माझी राख झाली ती कधीची,

धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो..

कोसळला नाही तो पहिला पाऊस तेव्हां,

पावसाआधी ढगातुन
त्यावेळी मी बरसलो होतो..

स्वःखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां,

तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यांत साठलो होतो..

तुला जाण नाही आसवाच्यां चवेची आजही,

तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो..

गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी,

श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो..

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही,

मनात डोकावलं नाहीस मी मनात मुरलो होतो..

जेव्हां ओघळलीस तु डोळ्यावाटे मीही मुक्त झालो,

इतके दिवस तुझ्या मी डोळ्यांत उरलो होतो..

नेहमीचं राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत,

देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो..

तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो,

अगं कुठेचं गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो..
.

No comments:

Post a Comment