Wednesday, January 4, 2012

तू मनावर घेणार आहेस

तू मनावर घेणार आहेस
आयुष्यातल्या प्रश्नांना
धीराने उत्तर देणार आहेस
तू मनावर घेणार आहेस
.
अपयश आलं तरीही
आयुष्य संपलं नाही
यशाने अजूनही
नाही म्हटलं नाही
वादळवारा आला तरी
तू झेप घेणार आहेस
परिस्थितीला निर्धाराने
शह देणार आहेस
.
तू मनावर घेणार आहेस
आयुष्यातल्या प्रश्नांना
धीराने उत्तर देणार आहेस
तू मनावर घेणार आहेस
.
तुझ्यातली शक्तीच
तुल साथ देईल
सारे काही संपले वाटताच
पुन्हा सुरवात होईल
अंधार गुट्ट पिऊनही
तू तेवणार आहेस
स्वतःवरचा विश्वास
कायम ठेवणार आहेस
.
तू मनावर घेणार आहेस
आयुष्यातल्या प्रश्नांना
धीराने उत्तर देणार आहेस
तू मनावर घेणार आहेस
.
.
(मनाची कविता / तुषार जोशी, नागपूर)

No comments:

Post a Comment