Wednesday, July 16, 2014

तू हसली आणि रडलीस तरीही तुझं प्रेम तोलू शकत नाही..

थोड उलट आहे माझं
तुझ्या हसर्या चेहर्यापेक्षा
मला
तुझा रडवा चेहराच आवडतो,,,,,,
मोहाच्या तीरापेक्षा त्यातला
आपलेपणा मला जास्त भावतो
तुझ्या प्रत्येक अश्रूत मला
माझं प्रेम दिसत
मधेच हसलीस तू तर

तर आमावश्येच चांदण वाटत
जरा वेगळाच जग आहे माझं
वाळवनटातल्या फुलासारखं
पाण्याचा स्पर्श जरी झाला
तरी चटका बसल्यासारख वाटतं....
पण काहीही म्हण
तू हसली तरी गोड दिसतेस
आन रडली तरीही... जास्तच
मीच वेडा
जो तुला समजू शकत नाही
तू हसली आणि रडलीस तरीही
तुझं प्रेम तोलू शकत नाही..

माझा ही जीव तिच्यात दडलाय...

तिला आवडतं माझ्याशी बोलायला

कारण मी बोलका आहे
तिच्या मनातला समजत
नाही तिला…

मी बोलून जातो तिच्या
एक एक विचारांची
वहीच मी उघडतो…

ती म्हणते बोलत जा ना
माझ्याशी मी खूप एकटी
आहे रे आपल्यां मध्ये असूनही
मी खूप परकी आहे रे…

तुझे बोलणं आपलं वाटतं
मग तिला माझ्या मिठीत मी
घेतो तिचाच मी असण्याचा
भास मी तिलादेतो ..

तिला तसे गाणी खूप आवडतात
प्रेमात पडली आहे सांगून ओठांवरही
तिच्या येतात कधी तर ती
माझ्या साठी हि गाणी बोलते
काही कविता ती माझ्यावर हि
लिहते मग वाटतं हेच ते प्रेम जे
आयुष्यात एकदाच भेटतं…

ती सतत माझ्याच विचारात
असते रात्री अपरात्री हि एकदा
फोन करत असते झोप नाही
लागत म्हणते मला कुशीत तुझ्या
घे ना माझ्या खांद्यावर डोकं ठेवून
सुखाने ती झोपते सकाळी म्हणते
मला सोडून तर जाणार नाहीस
नान नको रे जाऊस सोडून तू माझा
आहेस ह्या आशेवरच तर मी जगते ..

खूप सुंदर आहे ती अन प्रेम हि खूप
करते माझ्या फिकिरीत येणारे एक
एक अश्रू तिचे हे सांगते म्हणूनच तर ...
माझा ही जीव तिच्यात दडलाय...

Really I Love You So Much

का कधी कधी अस होत..???

का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो.
.
पण त्याला त्याची अजिबात जाणीव
हि नसते.
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते
.
पण त्याला त्याची अजिबात कदर नसते.
.

का कधी कधी अस होत.?
कि त्या व्यक्तीशिवाय आपण
अजिबात राहू शकत नाही
.
पण ती व्यक्ती आपल्याशिवाय
हि खूप खुश असते..
.
का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो. .
पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. .
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते .
.
पण त्याला त्याची अजिबात कदर नसते. .
का कधी कधी अस होत.?
.
कि त्या व्यक्तीशिवाय आपण अजिबात राहू शकत नाही .
पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते..

Tuzach......

Tuesday, May 27, 2014

विसरून जा स्वप्न माझं.........

 

मीचं एक स्वप्न आहे,
स्वप्न माझं बघू नको..
पाहिलस जरी स्वप्न माझं,
माझ्यासाठी जगू नको..
अविचारी मन माझं,
विचार माझा करू नको..


केलास जरी विचार माझा,
माझ्यावरती मरू नको..
पुसून टाक अश्रू तुझे,
डोळ्यात तसेचं विरलेले..
मिटवून टाक नाव माझे,
हातावर तुझ्या कोरलेले..
विसरून जा स्वप्न माझं,
नशीब तुझं फसेल..
पाहिलसं माझं स्वप्न म्हणून,
जग तुझ्यावर हसेल..

_________________________________________________________

Labels

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!
नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं
तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली
तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे

तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे
मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं
धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात
स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे
तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे
परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर
पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं
कदाचित चूक नव्हती
दोघांचीही ,पण जिद्द
होती ना
आपापला इगो मिरवण्याची
मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं ,आणि मी माघार घेतली
हो , मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला
तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे , हे
दाखवून दिलंस ....
आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते
वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?
मला माहित आहे रे ,
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन
असं धावतं कि थांबतच नाही
एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन
मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय ''
____________________________________________________-__

Labels

AAI(9)aswesome(33)BABA(4)break up(39)chitr kavita(11)love(122)maitri(10)Marathi Prem Kavita(41)memories(39)sagar wavhal(1)spardha(2)पाऊस(1)

Wednesday, April 23, 2014

शेवटी तू सोडून गेलीस

शेवटी तू सोडून गेलीस

टाईमपास नाही म्हणता म्हणता खरं प्रेम
करऊन गेलीस
स्वतः माञ माझ्यापासून दूर निघून गेलीस
आठवतो मला तो क्षण
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले
आई-बाबा आणि साईबाबा ची शप्पथ घेऊन
तुला ह्रदयात विसवले
तेव्हा मला खरंच वेड लागले प्रेमाचे
फक्त तुझे आणि तूझेच होऊन जायचे
मी खरंच गं खूप गरिब होतो
म्हणूनच तर मी तूझ्या बाबांचा शञू होतो
मी नव्हतोच गं कधी तुझ्या लायकीचा
पण तुझ्या प्रेमाने मला बनवला बाळ
देवकिचा
पण का होते गं ही गरिब
श्रीमंतीची तूलना
तूच आता या बद्दल काहीतरी बोलना
तू आहेस रे खुप साधा
मनमोकळ
बोलायचा असायचा पक्का इरादा
म्हणूनच तर तू
या ह्रदयाला भावला होतास
कितीतरी खोलवर या ह्रदयात
गुंतला होतास
पण काही ही झालं तरी मी एकटी निर्णय
घेणारी नव्हती रे
माझ्या घरचे ही मला तुझ्यासोबत हवे
आहेत रे

तुझं ठीक आहे रे तु हव तेव्हा ओरडू शकतोस
चिडू शकतोस
पण मी काय करू
कोणाकडे हे दुःख हलकं करू
जाऊदे झालं गेलं विसरून जा
नव्याने सुरूवात कर आयुष्यात पूढे जा
"साला आज आपल्याला कऴला आपण
शिकला नाय पण आपल्याला बोलता येत
तु शिकलीस पण तुला बोलता येत नाय"
"टाईमपास नव्हता तो
आपल्या आयुष्यातला सर्वात बेस्ट टाईम
होता
ती गेली पण आपल्याला टोटल बदलून गेली
आता आपण शिकणार खुप मोठा माणूस
होणार टायवाला
आणि दाखवून देणार
आपला लव्ह खरा होता
टाईमपास नव्हता..."—

Tuesday, February 11, 2014

मराठी चित्र कविता वाचा नवीन ब्लॉग वर …

मराठी चित्र कविता वाचा नवीन ब्लॉग वर … 
कवी सागर वाव्हळ /यांच्या  प्रसिद्ध कविता  वाचा  आता त्यांच्या ब्लॉग वर . 

त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा …। 
http://sagarwavhal.blogspot.in

Saturday, February 1, 2014

एक दिवस असा होता की,

एक दिवस असा होता की,
कुणीतरी माझ्या,
फोनची वाट पहायचं.....

स्वतःच फोन करुन,
मनसोक्त बोलायचं,
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....

एक दिवस असा होता की,
कुणीतरी तासनतास,
माझ्याशी गप्पा मारायचं.....

एक दिवस असा होता की,
मनमोकळे पणानं,
मला सर्व काही सांगायचं.....

आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं,
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,
वेळ देऊनही फोन नाही करायचं.....

आज दिवस असा आहे की,
मी माझं नातं मनापासुन जपायचं,
मिळालेल्या वागणुकीतून मन मात्र
दुःखायचं.....

पण ???

माझं हे दुःख कोणाला कळायचं.....

आज प्रश्न असा आहे की,
का कुणाशी स्वार्थासाठी नातं
जोडायचं,
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र
सोडायचं.....

का स्वतःचं व दुस-याचं,
जीवन भकास करायचं
मित्रा, आपल्याला नाही हे जमायचं.....

दुःखातही आपण मात्र हसायचं,
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....  

फरक फक्त इतकाच असेल ???

Break-Up Ke Baad.....

चार फुले तुझ्यावर पडतील,

चार फुले माझ्यावर पडतील.....

फरक फक्त एवढाच असेल ???

तु तेव्हा मंडपात असशील,

आणि मी असेन स्मशानात...!!

बरोबर एक वर्षांनी तिच,

गडबड असेल, लगबग असेल.....

फरक फक्त इतकाच असेल ???

तुझ्या घरी बारश्याची तयारी असेल,

आणि माझ्या घरी माझे श्राध्द
असेल...!!
    

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील..

रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करते

चुकता त्याच्यासाठी काहीतरी मागत
असते
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून
स्वता: साठीपण
मागत जा त्याला म्हटले त्याच्याशिवाय
माझे
आयुष्य तरी आहे का
मला झोपायला जमीन दिलीस
तरी चालेल .... पण

त्याला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस
तरी चालेल ... पण
त्याला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण
त्याच्यासाठी ... न
विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले
तरी चालेल ... पण
त्याला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ...
पण
त्याच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न
रडणाऱ्या देवाचा डोळा पण
तेव्हा पानावला,
का करतेस इतके प्रेम त्याच्यावर त्याने
प्रेम तुझे
स्वीकारले नाही, का मरतेय
त्याच्यासाठी त्याने
जगणे तुझे मान्य केले नाही,
मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे
तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात
पडशील.. —

प्लीज परत येशील का ???

प्लीज परत येशील का ???
मला नेहमी सारखं,
बावळट बोलायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्याशी कारण नसताना,
खोटं खोटं भांडायला.....

प्लीज परत येशील का ???
कसा रे वेडा तु,
सोन्या म्हणायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्याशी फोनवर तासन-तास,
गप्पा मारायला.....

प्लीज परत येशील का ???
मधाळ हसतात कसं,
मला दाखवायला.....

प्लीज परत येशील का ???
माझे ओघळणारे अश्रूं,
ओँझळीने अडवायला.....

प्लीज परत येशील का ???
प्रेम कसे करतात,
मला शिकवायला.....

प्लीज परत येशील का ???
माझे विरहात होणारे,
हाल पहायला.....

प्लीज परत येशील का ???
दुःखाच्या दरीत,
पुन्हा ढकलायला.....

प्लीज परत येशील का ???
फसवे नाते खोटी वचने,
पुन्हा तोडायला.....

प्लीज परत येशील का ???
ह्रदयाला झालेल्या,
जखमा भरायला.....

प्लीज परत येशील का ???
माझ्या मुडद्याला एकदा,
बिलगुन रडायला.....

प्लीज परत येशील का ???
माझा जळणारा निष्पाप,
देह पहायला.....

प्लीज परत येशील का ???
   

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

© सुरेश सोनावणे....

Thursday, January 16, 2014

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
---------------------------------------------------
तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं
उगीच असं घडत नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
तुला स्वप्नात घेतल्याशिवाय
मनही निजू शकत नाही


तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
एक क्षणही तुझ्या आठवणीशिवाय
माझा कधीच जात नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
फक्त तूच माझं विश्व झाली आहेस
इतकं वेड मला लागू शकत नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
उगीच माझ्या रोमा रोमात
तुझी प्रीत फुलली नाही .