प्रेम हे प्रेम आहे..
किती प्रगल्भित हे,अडीच अक्षर आहे,
नाही बघत कोण अडाणी,कोण साक्षर आहे;
कधी,कुठे,कोणावर होईल,काय नेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
... हळुवार असलं तरी आत्मिक रित्या शक्तिमान
आहे,
ओघीत असलं तरी,नैतिक रित्या नीतिमान आहे,
यात कसलं स्थैर्य वा काय क्षेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
कायम ज्यात विरह करावा लागतो सहन,
बोलता माणूसही,विचारात पडतो गहन;
मिळालं वा नाही मिळालं,तरी अश्रुन्वित थेंब
आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
ज्यात दिवस जातो तंद्रीत आणि रात्र जाते
जागीत,
ज्यात काहीच ठाम नसते, स्वतःचेच भागीत;
निव्वळ ठोक ताळ्यावर,सर्व काही जेम तेम
आहे ;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
मानलं तर सदैव, हुकुमी एक्का आहे,
जिंकतो तो ज्याचा, इरादा पक्का आहे;
पत्त्यांनाही मागे टाकणारा हा,आगळाच गेम

No comments:
Post a Comment