माझी बाहुली ..
माझी बाहुली ..
माझी बाहुली
भुकेली भुकेली
रडु लागली
गाय हंबरली
दुधाची तपेली
भरुन वाहिली
केळ आणिले
साल काढले
दुधात घातले
शिकरण केले
बाहुलीने पाहिले
पुढे पाऊल टाकले
सालीवरुन घसरली
आईने सावरले
बाहुली हासली
केळीचे शिकरण
खाऊन संपवले
-रजनी अरणकल्ले-१७.१२.१२..माझी बाहुली
No comments:
Post a Comment