Wednesday, January 18, 2012

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

नजरेने तुझ्या मनी स्पर्श असा केला,


हरली मी.....अन् तू माझा दरबार नेला...


भेटुनी तुला आज हे सुखचैतन्य आले,


तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....




रोजचेच वारे.....आज खूप बेभान झाले,

पायवाट माझी आता....तुझ्यासंगी चाले,

पाखराला आज ह्या घरटे मिळाले,

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....



मनी स्वप्नांचे मी एक घरकुल बांधले,

क्षण क्षण मी तुझ्यात चिंब चिंब नाहले,

शिंपल्यात तुझ्या...आज मी मोती जाहले,

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....



माझ्याच चंद्राची आज मी चांदणी झाले,

अपुरा तू नी मी...मी अर्धांगी झाले,

स्वप्न माझे दुरावलेले...आज सत्यात आले,

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....



जगू दे दोन क्षण मज आता...श्वास माझा चोरू नको रे,

प्रीत माझी समजुनी....तू आता परतू नको रे,

अनोळखीच सुख तसे मज...भेटाया त्यास आतुर झाले,

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....



No comments:

Post a Comment