Thursday, January 19, 2012

ए आई,

ए आई...


लहान बाळाला काय समजतं?


असं आपल्याला नेहमी वाटत..


भूक लागली कि रडायचं,


अन पोट भरलं कि हसायचं ..


पण त्याच रडण्यातून आणि हास्यातून ते आपल्याला खूप काही सांगत 


असतं..



ए आई,

सतत मला तुझ्या छातीशी असू दे,

अंगाईगीतापेक्षा मोहक तुझ्या हृदयाचे ठोके



तूच मला सकाळ संध्याकाळ घाल जेऊ,

मग गोष्टीत तुझ्या असो काऊ किंवा चिऊ



रात्री सुद्धा मी तुझ्याच कुशीत झोपेन,

आणि दचकून उठलेच तर तुझीच उब शोधेन



माझी नजर फिरली तरी तू माझ्याचकडे बघत रहा

तुझ्याकडूनच कितीतरी नवीन गोष्टी शिकते मी, जरा निरखून पहा



तुला काय वाटत, मला काही समजत का नाही?

तुझी नजर फिरतच मी रडते कि नाही..!



-
गौरी कोतवाल-पांडे

No comments:

Post a Comment