साता समुद्रापार गेलो पण मातीचा वास गेला नाही
इंग्रजी वाचुन थकलो पण मराठीचा ध्यास गेला नाही
शेक्सपियरला कोळले पण तुकोबाची कास गेली नाही
थेम्समध्ये न्हालो पण चंद्रभागेची आस गेली नाही
आल्प्सच्या शिखरात फिरलो पण मन शिवनेरीवरच राहीले
महायुद्धाच्या समरभुमीवरही फुल मात्र शिवबालाच वाहीले
बल्जच्या खिंडीतही पराक्रम बाजी प्रभूचाच आठवला
वाटर्लू पाहून मनात मनात भाऊचा पानीपत साठवला
सर्वधर्मसमभाव सांगताना मनात वैष्णवांचीच भक्ती केली
इंग्रजी ग्रंथ वाचतानाही मनात फक्त ज्ञानेश्वरीची उक्ती केली.>>>>

No comments:
Post a Comment