Wednesday, January 18, 2012

किलबिल,किलबिल

किलबिल,किलबिल
दाणे टिपती
माझ्या अंगणी
चिमणा चिमणी!

चिव चिव चिवाट
ईवल्याशा पिलांचा
गान जणु गुनगुन
झाडावरल्या घरट्यातुन!

चोची चोचीने
रोज भरविती
ऊडण्या शिकविती
माय-बाप ते!

हुशार पिल्ले
ऊडण्या शिकली
बाहेर आली
घरट्यातून ती!

आकाश पाहिले
पंख पसरले
घेतली झेप
ऊंच भरारी घेण्यास!

ऊलगड पंख अलगद
घे झेप गगनात
घे भरारी घे भरारी!
येशील न परतून घरी?

रजनी अरणकल्ले १८.१२.१२-घे भरारी(लिहा ओळीवर कविता-८४ म.क.)

No comments:

Post a Comment