होईल का कधी असे
तू उघडशील डोळे
अन दिसेन फक्त मी
चालता चालता तुझ्यासवे
हाती हात येईल
अन हातावर तुझ्या
जीवनी लिहेन मी
तू देशील हाक
अन आह भरेन मी
फरक फक्त देहाचा
अन श्वास होईन मी
वाहशील फुलांसवे
सुगंधाने भरून
अन म्हणशील
सोडायला येते मी
वेड्यासारखी का ग वाहते
लाटांमधली लय
वार्या मधली सल
मीच मिटतो डोळे
अन दिसते फक्त तू
होईल का कधी असे
रोज भेटशील मला
अन म्हणशील
जावू नको न तू
सहजच वार्यासारखे
येशील झुळुकेने
राहशील शिरशीर बनून
होईल का कधी असे
वाट पाहतील डोळे
भेटता भेटता जाळे
विणून जाशील तू
तुझ्या सवे माझे
काय काय होते
झर्यासारखी तू
अन आटत जातो मी
पाऊस हि लहरी
कितीदा थांबतो तो
तुझे मात्र ढग सारखे
अन कधी न आटतो तो
तुझ्यासारखे का ग
मला होता येत नाही
मी जातो तरी
उरता येत नाही
No comments:
Post a Comment