Wednesday, January 18, 2012

@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@

@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@



तू विरोधी पक्ष होतेस तेह्वा 


राग तुझा मिरची सारखा असतो ....


तू बिलगतेस अंगाला तेह्वा 


स्पर्श तुझा खुर्ची सारखा असतो......



मी सामान्य कार्यकर्ता होईल ,

तू हायकमांड होशील काय ??

सरकार अपक्षांना देते ,

तेवढे डिमांड देशील काय ?



तुझा माझा संयुक्त जाहीरनामा

मी आघाडीप्रमाणे जपत आहे ..

माझ्याशी बंडखोरी करशील तर

लोकशाहीची तुला शपथ आहे .

No comments:

Post a Comment