का अशी ती प्रेम करते तात्पुरते
लांबुनी पाहून हसते तात्पुरते
चेहरा मम रोज ती न्याहाळताना
ओठ दातांनाच मळते तात्पुरते
ती मला स्वीकारते नाकारतेही
हे असे ती काय करते तात्पुरते
कैद केले मी तिला हृदयात माझ्या
रोज माझे नाम जपते तात्पुरते
चांदण्यावरती कसा ठेऊ भरोसा
तेज चंद्राचेच ठरते तात्पुरते
हाच भास्कर हा शशी अन हेच तारे
रोज जगती रोज मरते तात्पुरते
मानवाचा जन्म मृत्यू एकदाचा
मानवी जगणेच असते तात्पुरते
काळजाचे हेलकावे खात साबिर
संशयाचे भूत बघते तात्पुरते
लांबुनी पाहून हसते तात्पुरते
चेहरा मम रोज ती न्याहाळताना
ओठ दातांनाच मळते तात्पुरते
ती मला स्वीकारते नाकारतेही
हे असे ती काय करते तात्पुरते
कैद केले मी तिला हृदयात माझ्या
रोज माझे नाम जपते तात्पुरते
चांदण्यावरती कसा ठेऊ भरोसा
तेज चंद्राचेच ठरते तात्पुरते
हाच भास्कर हा शशी अन हेच तारे
रोज जगती रोज मरते तात्पुरते
मानवाचा जन्म मृत्यू एकदाचा
मानवी जगणेच असते तात्पुरते
काळजाचे हेलकावे खात साबिर
संशयाचे भूत बघते तात्पुरते
No comments:
Post a Comment