Wednesday, January 18, 2012

का राहतेस उदास अशी


का राहतेस उदास अशी


डोळ्यात लपवून सारं काही


डोळे लागून गेले प्रतिक्षेत ज्याच्या,


डोळे लागून गेले प्रतिक्षेत ज्याच्या


जो निघून गेला लांब तुझ्या



अधूरं असलेल्या वाटेवर प्रवास आता


फक्त आठवणी सोबत तुझ्या


कधी कधी डोळे सुकून जातात


तर कधी कधी डोळे भरून येतात


पडणारा प्रत्येक थेंब अश्रूचा गालावर ओरघळून जातं


अन् फक्त ते स्वप्न आठवू लागतं


जे वेगळ्या जगातून आलेलं


आठवू लागतं


खालेला प्रत्येक घाव काळजावर ज्याचा सांगू लागतं की


खुप प्रेम केले तुझ्याशी


पण या काळजाची हाक


कधी कुणा कळालीच नाही


गाढून सारं काही या काळजात


चालत आहेस अशी अंधारात


कधी ना कधी विझणारं


हे जीवन आपलं


आहे एक ज्योत जशी


तरीही का राहतेस उदास अशी
 





No comments:

Post a Comment