Wednesday, January 18, 2012

........पाऊसवेडी

पाऊस कोसळतोय


जा ! भिजुन घे...


नाहिच जमलं तर


खिडकित उभं राहुन बघ..

काय झालं !

तो खुणावतोय

तो वेडावतोय

मग जा कि,

नेहमीच जगतो चौकटीत

जरा तोडुन बघ कधीतरी

काय होइल !

लोक हसतील,
हसु देत

आजारी पड्शील ,

पडु दे

कॉलेज / ऑफ़िस बुडेल ,

बुडू दे

जा कि

भिजुन घे

अगदि मनापासुन

त्यालाही असतच कि
कधितरी भिजायच

ओल्या ओल्या

पाऊसात चिंब चिंब
व्हायच असत

जुन्या आठवणींमध्ये



रमायच असत
आणि पाऊसासोबत



डोळ्यातुन वाहयच असत



नकळत....अगदि तुझ्याही

मन आहे ते

त्यालाही एक मन असनारच कि...

जा भिजुन घे....



........पाऊसवेडी

No comments:

Post a Comment