शांत अश्या आज संध्याकाळी..
बालपणीची मैत्रीण आठवली..
भांडणारी भातुकलीच्या खेळासाठी..
ती एक सवंगडी आठवली...
आजही वाटते येयील ती..
काढून चिमटे, चीडवेल ती..
भातुकली च्या खेळ साठी,
बालिश हट्ट पुन्हा करेल ती...
तारुण्याची जेव्हा चाहूल लागली..
ओढणी ती नाचवू लागली..
पाहुनी आरश्यात रूप निहारु लागली..
जाणून मग ती दुरावा ठेवू लागली...
बालपणीचा खेळ आता संपला होता..
माहित नव्हते भाव तिच्या मनी काय होता..
शिकायचे दिवस, एकामागून एक सरत होता..
तिचा चेहरा तसाच लाजेने उजळत होता...
असेल का प्रेम तिचे मजवरी प्रश्न मला..
तिच्या मनाचे गणित कळत नव्हते मला..
येता जवळ हसायची हळूच पाहुनी मजकडे..
नजरेचे खेळ सारे, आठवती बालपणीचे...
वर्ष मागून गेली वर्षे, गुंता कधी सुटायचा..
होईल का मग कार्यक्रम तिलाच पहायचा..
आयुष्याचं गणित, साठी तिच्या सुटावं..
अर्धांगिनी म्हणून स्वप्नं तिचाच पहावं..
No comments:
Post a Comment