लगो S S री
हृदय दिलेस
गोड प्रेयसी दिलीस
वरून विरहाची
झणझणीत फोडणी दिलीस
कधी लपाछुपी तर
कधी शिवाशिवी दिलीस
आयुष्याच्या मैदानात
माझी दमछाक केलीस
.
सतत आदर्शांच्या
पहाडावरून
नदीत यावे लागतेय
विवेकाच्या डावात
आऊट व्हावे लागतेय
तुझ्या कलियुगात नुसते
नदी की पहाड
खेळावे लागतेय
.
स्वप्नांची आरास लावताच
तू आघातांचा चेडू टाकून
म्हणतोस लगो S S री
आणि आमची दमछाक
पुन्हा आरास रचतांना
तुझी धाप मारण्याची मुजोरी
कसली ही खेळतोस लगोरी
.
तुषार जोशी, नागपूर
भुर्रध्वनी: +९१ ९८२२२ २०३६५
हृदय दिलेस
गोड प्रेयसी दिलीस
वरून विरहाची
झणझणीत फोडणी दिलीस
कधी लपाछुपी तर
कधी शिवाशिवी दिलीस
आयुष्याच्या मैदानात
माझी दमछाक केलीस
.
सतत आदर्शांच्या
पहाडावरून
नदीत यावे लागतेय
विवेकाच्या डावात
आऊट व्हावे लागतेय
तुझ्या कलियुगात नुसते
नदी की पहाड
खेळावे लागतेय
.
स्वप्नांची आरास लावताच
तू आघातांचा चेडू टाकून
म्हणतोस लगो S S री
आणि आमची दमछाक
पुन्हा आरास रचतांना
तुझी धाप मारण्याची मुजोरी
कसली ही खेळतोस लगोरी
.
तुषार जोशी, नागपूर
भुर्रध्वनी: +९१ ९८२२२ २०३६५
No comments:
Post a Comment