Thursday, January 12, 2012

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं
ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस ' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं
ते पण एक वय असतं

सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

No comments:

Post a Comment