सगळ्याच वाक्यात शब्द कुठे असतात?
रिकामी असून पण ती खूप खोल का असतात?
सगळ्याच फांदीवर पान कुठे असतं?
सगळ्याच सुंदर चेहऱ्यामागचं मन छान कुठे असतं?
अळवावर कधी थांबतंय का पाणी?
तात्पर्य नसणाऱ्या पण असतात कहाणी,
सगळ्याच हसण्यांचा अर्थ कुठे कळतोय?
कुणाला माहितीय हा सूर्य का जळतोय?
प्रत्तेक तहान पाण्याने कुठे भागते?
हवं ते माणूस हवं तेव्हा हवं तसं कुठे वागते?
प्रत्तेक जखमेतून रक्त कुठे वाहते?
उघडी नजर तरी….सगळं कुठे पाहते?
प्रत्तेक हसरा चेहरा खुश कुठे असतो?
काही काही वाटांना शेवट का नसतो?
ज्याने "थांबावे" असे वाटतं
त्याला नेहमी जायचं का असतं?
मनाला या ठरलेल्याच माणसांसोबत
खुप वेळ राहायचं का असतं?
सगळे प्रश्न असे विचित्र?
त्यांची उत्तरं पण विचित्र
रिकामी असून पण ती खूप खोल का असतात?
सगळ्याच फांदीवर पान कुठे असतं?
सगळ्याच सुंदर चेहऱ्यामागचं मन छान कुठे असतं?
अळवावर कधी थांबतंय का पाणी?
तात्पर्य नसणाऱ्या पण असतात कहाणी,
सगळ्याच हसण्यांचा अर्थ कुठे कळतोय?
कुणाला माहितीय हा सूर्य का जळतोय?
प्रत्तेक तहान पाण्याने कुठे भागते?
हवं ते माणूस हवं तेव्हा हवं तसं कुठे वागते?
प्रत्तेक जखमेतून रक्त कुठे वाहते?
उघडी नजर तरी….सगळं कुठे पाहते?
प्रत्तेक हसरा चेहरा खुश कुठे असतो?
काही काही वाटांना शेवट का नसतो?
ज्याने "थांबावे" असे वाटतं
त्याला नेहमी जायचं का असतं?
मनाला या ठरलेल्याच माणसांसोबत
खुप वेळ राहायचं का असतं?
सगळे प्रश्न असे विचित्र?
त्यांची उत्तरं पण विचित्र
No comments:
Post a Comment