Thursday, January 12, 2012

खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!!

तुझी वाट पाहतो तेंव्हा 
सांज वेळेची आठवण येते
तुझ्या पाउल खुणांची 
किती दाटण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
केवड्यांची त्या आठवण येते
मी आणलेल्या गजरयांची
परत एकदा साठवण होते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
आठवले तुझे पैंजण होते
आताही कानावर या
त्यांची ओघवती छन छन येते...

तुझी वाट पाहतो तेंव्हा
मनात मेघांची अडचण होते
ओल्या चिंब पावसात मग
मन माझे न्हाऊन घेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
चौघड्यांची ती साद येते
तुझ्या लग्नात वाजणाऱ्या सनई संगे
मला तुझ्यापासून दूर नेते....

तुझी वाट पाहतो तेंव्हा
जड माझी पापणी होते
तुझ्या संसारातल्या वसंतान
थोडीशी ती हलकी होते...

खरच तुझी वाट पाहतो तेंव्हा !!!!!

No comments:

Post a Comment