Tuesday, January 3, 2012

आयुष्य ..............

आयुष्य
आयुष म्हणजे जणू एक कोड,
सुटता सुटते थांबता थांबते,
उभ्या आडव्या चौकोनातच,
सारे जग दिसते.

पांढरा चौकोन सुखाचा,
काळा चौकोन दु:खाचा ,
वर वर पाहता काळेच सारे दिसते,
नात्यांच्या बंधातून शुभ्र झाल तयार होते.

बुद्धिबळच जणू हे आयुष्याचे,
सरळच आहे सारे काही, नाही गुंतागुंतीचे
फरक इतुकाच दोघांमध्ये,
राजाचे वैर राजाशी तिथे, इथे स्वतःशी स्वतःचे.

कोडी सोडवण्यातच मजा सारी दडलेली
सुख दु:खाच्या प्रत्येक क्षणात आसवांनी साथ दिलेली
पण कोड कधीच सुटत नसत,
आपल्याकडे पाहून सतत ते हसतच असत,
सुटत नाही, म्हणून ते सोडायचं नसत
काळ्या पांढर्या चौकोनात स्वतःला शोधायचं असत.
@ लकी.........

No comments:

Post a Comment