Tuesday, January 3, 2012

सावली...

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,

गारवेला गार वारा वाहतो सभोवती,

पारिजाता पालवीची आस आहे लागली,
...
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली...

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,

गूज काही सांगण्यासी नभ उतरले भूवरी,

हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,

धुंद सारा क्षण परंतु, तुच नाही, सावली...

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,

बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,

त्या किनाऱ्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गुंजली,

धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली...

No comments:

Post a Comment