Thursday, January 12, 2012

मृगजळ........

एक एक क्षण आठवणीत माझ्या....
तू प्रत्यक्ष यावे हि गरज कशाला?
प्रयत्न कर तु ही हिरावण्याचा ते सखे.....
नसतील ते तर हवं हे जगणं कशाला?

माझ्या मनात आठवण तुझी.....
तुझ्या मनात स्मारक माझे....
मृतांची तू आठवण काढशील कशाला?
क्षण पुरला तोडाया जे.....ते नाते कुणाला सांगशील कशाला?

चंद्र आहे तुज पाशी तुझा....
माझ्या अंधाराचा तुला त्रास कशाला?
वाऱ्यावर सोडले जे तू घर माझे....
अंगणाची तुला त्या काळजी कशाला?

अश्रूंचा तू माझ्या हिशोब लाव वेडे....
देव विचारेल,"अशी वागलीस कशाला?"
हसून दे तू उत्तर त्याला,
"नाही माझा दोष कसला...तोच वेडा मृगजळावर फसला कशाला?"

No comments:

Post a Comment