Thursday, January 12, 2012

फिर मुहोब्बत करने चला है तू

आभाळ दाटलेलं
पावसाने जडावलेलं
रस्ता थांबलेला
जरासा सुस्तावलेला
आळस भिनलेला
गारठा वाढलेला
एकांत कंटाळलेला
घरात दडलेला
कॉफीत दरवळलेला
आठवणींनी वेढलेलाकासावीस झालेला
चाहुलीनं मोहरलेला
सरींनी भिजलेला
काचेवर ओघळलेला
खुदकन हसलेला
स्वप्नात हरवलेला
……
….
ए दिल…….. संभल जा जरा………
फिर मुहोब्बत करने चला है तू




No comments:

Post a Comment