Sunday, January 8, 2012

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही
"काही बोलायचं आहे पण बोलणार नाही"
तुझ्या लपलेल्या आठवणीना
परत कधी शोधणार नाही
तुझ्या जपून ठेवलेल्या
त्या अनमोल शिदोरीला
आता कधी सोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!
ती देलेल्या प्रत्येक क्षणांना
परत कधी डिवचणार नाही
तू उराशी बाळगलेल्या
त्या जिरकाल क्षणांना
आता कधी छेडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!
तू भेटलेल्या स्थळांना
परत कधी भेटणार नाही
त्यांच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या
आपल्या त्या गोड गाठी-भेटीना
आता कधी कडवठ करणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!
तू जागवलेल्या भावनांना
परत कधी झोपवणार नाही
त्यांनी भरून आणलेल्या
दोघा मधल्या अतुठ प्रेमाला
आता कधी तोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!

No comments:

Post a Comment