Wednesday, January 4, 2012

तुझ वाचून जीवन हे व्यर्थ..

आठवतात का ते दिवस तुला, जायचो जेव्हा शाळेत..
गुंफलेले हाथ आपले, जसे ओवलेले मनी माळेत..

आपल्या कडे पाहून तेव्हा कुणी काही बोलायचे..
खरच सांगतो हाथ माझे मुठी आवळायला बघायचे..

आणायचो मी चोकलेट्स, वाट पाहत तुझी कधी चघळायचो..
येई पर्यंत तू, मुददाम एकंच शिल्लक ठेवायचो..

सरली काही वर्षी अशी, साथीने तुझ्या दहावी गाठली..
बदलले क्रम अभ्यासाचे, मग मात्र भेट हि थांबली..

आता मात्र पंख फुटले, हाथहि असे आभाळाला टेकले..
आहेस कुठे तू.. बाकी सगळे मात्र भेटले..

नसता माहित पत्ता, शोधात असतो तुला..
मनावर आहे राज्य तुझ, ये अन गाजव सत्ता..

बालपणीच घेतला होतास हृदयाच्या माझ्या ठाव..
म्हणून तर घेतो, प्रत्येक श्वासामागे तुझ्या मागे धाव..

अशी मग अचानक समोर दिसलीस..
गुंफलेले हाथ तुझे - त्याचे, पाहून छान हसलीस..

बघ नं काळ कसा बदलत गेला, नात हि बदलून गेला..
जाता जाता हृदयी माझ्या कळा मात्र देवून गेला..

काल तुझ्या आठवणी सह चोकलेट खात होतो ..
खिशात हाथ घालून, किती शिल्लक ते हि पाहत होतो...

फुटलेले पंख आता थकले, जमिनीवर अलगद उतरले..
वेदनांचे उठले मोहोळ, क्षणभर तेही मनी दाटले..

आता कुणी छळता तुला मुठी त्याच्या हि वळतील..
स्वप्नं माझी तुझ्या आठवणीत आता तीही जळतील..

झालंय आता मन दगड माझे, स्पर्शाला नाही अर्थ..
खरच सांगतो तुला, तुझ वाचून जीवन हे व्यर्थ..

मयूर आपटे...!!

No comments:

Post a Comment