Thursday, January 12, 2012

एकदा तरी सांगना मला साथ माझी देशील का?

धडपडतोय तुझ्याशिवाय हात देऊन सावरशिल
का?
एकदा तरी सांग मला साथ माझी देशील का ?
वाट तुझी पाहतो आहे
वेड्या चकोरा सारखी
पावसाचा पहिला थेंब होऊन तहान
माझी भागवशील का ?
एकदा तरी सांग मला साथ माझी देशील का?
रणरणत्या या उन्हात मी वेडा एकटाच
फीरतो आहे
एखाद चुकार झाड बनुन
सावली मला देशील का?
एकदा तरि सांग मला साथ माझी देशील का ?
दुःख दिले तुला म्हणून तु दुर जात आहेस
पण जाता जाता एकदा मागे वळुन बघशील का ?
एकदा तरी सांगना मला साथ माझी देशील
का?

No comments:

Post a Comment