Thursday, January 12, 2012

प्रेम नेमकी काय असत..???

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …
... कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं
म्हणजे प्रेम की
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम….
...
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम
की
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे
प्रेम …
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं
म्हणजे प्रेम …
कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे
प्रेम...
कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम
….
कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम
….
कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम
….
कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …
कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….
कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजेप्रेम
की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच
प्रेम….!!"
खरच..!! प्रेम नेमक काय असतं..!!!
प्रेम नेमकी काय असत..???

No comments:

Post a Comment