समुद्र.....
दूरवर पसरलेला निळाभोर शांत
पांढरी झाल पांघरलेला लाटांन मधेच रमणारा
माणसांपासून अलिप्त राहणारा, पाण्यालाही सीमा बांधणारा
असाच आहे हा, नाही ज्याला अंत
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
थोडा किळसवाणा , थोडा आवडणारा
हसता हसता मधेच रौद्र रूप घेणारा
तरीही चांगला कधी कधी वाईट
स्वतःच्या खारट पणातही नाविन्याची गोडी देणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
नेहमीच दुसऱ्यांच ऐकणारा, साथ त्यांना देणारा
ऐकता ऐकता कधीतरी मग स्वतःच रडणारा
इतरांच हसण - रडण,सुख-दु:ख स्वतःच्या पोटात दडवणारा
कोणी कितीही लाच देऊ केली तरी
प्रत्येक गुपिताला गुपितच ठेवणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
सजीव नसला तरी माणूसपण जपणारा
आपल मानणा-यांना एकत न सोडणारा
इतरांचे हेवे दावे सहज सहन करणारा
एकाच असा दोस्त शेवटी सगळ्यांना
स्वतः मधेच विलीन करून घेणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
दूरवर पसरलेला निळाभोर शांत
पांढरी झाल पांघरलेला लाटांन मधेच रमणारा
माणसांपासून अलिप्त राहणारा, पाण्यालाही सीमा बांधणारा
असाच आहे हा, नाही ज्याला अंत
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
थोडा किळसवाणा , थोडा आवडणारा
हसता हसता मधेच रौद्र रूप घेणारा
तरीही चांगला कधी कधी वाईट
स्वतःच्या खारट पणातही नाविन्याची गोडी देणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
नेहमीच दुसऱ्यांच ऐकणारा, साथ त्यांना देणारा
ऐकता ऐकता कधीतरी मग स्वतःच रडणारा
इतरांच हसण - रडण,सुख-दु:ख स्वतःच्या पोटात दडवणारा
कोणी कितीही लाच देऊ केली तरी
प्रत्येक गुपिताला गुपितच ठेवणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
सजीव नसला तरी माणूसपण जपणारा
आपल मानणा-यांना एकत न सोडणारा
इतरांचे हेवे दावे सहज सहन करणारा
एकाच असा दोस्त शेवटी सगळ्यांना
स्वतः मधेच विलीन करून घेणारा
जगावेगळा असा हा माझा मित्र
समुद्र........
No comments:
Post a Comment