Saturday, January 7, 2012

मी असाच आहे

मी असाच आहे
कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे

भेटलो नाही कधी तरी
भेट तुझी नि माझी नेहमीच आहे

रागवणं हा तर फ़क्त बहाना आहे
प्रेम वाढविण्याचा हा नविन"Formula"आहे

तुझी आठवण येते,हे तर कारण आहे
वेडे, तुला विनाकारण छळणं, हा तर माझा स्वभाव आहे

गप्प कितीही असलो तरी
मनातुन बडबड फ़क्त तुझीच आहे

कविता जरी माझी असली तरी
शब्द मात्र तुझेच आहे

मी असाच आहे कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे...

No comments:

Post a Comment