Tuesday, January 10, 2012

मी कवी आहे प्रेमाचा

मी कवी आहे प्रेमाचा

मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
प्रियेच्या केसातून अलगद
शब्दांचे बोट फिरवतो
.
साठवतो आठवणी मी
तिच्या असण्या नसण्याच्या
हृदयाची भरती ओहटी
लाटा हसण्या रूसण्याच्या
.
ही ओढ तिची रक्ताच्या
पेशीं मधून भीनलेली?
की हुरहुरण्याची संधी
जगण्याला मिळालेली
.
सौंदर्य स्पर्षगंधाचे
मी येता जाता स्मरतो
मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
.
.
तुषार जोशी, नागपूर
+91 98222 20365

No comments:

Post a Comment