आज तो दिवस आला .....
कधी उतावीळ, कधी आतुर,,
ओढ अशी मना त्या दिवसाची,,
आस होती दोघां, आपल्या मिलनाची..!!
आज तो दिवस आला .....
सनई - चौघडे सोबत वाजंत्री, कानी सप्तसूर,,
सजलेला मांडव फुला, उभा भटजी नेसुनी धोतर,,
आप्त - नातलग उभे मांडावा, टाकण्य अक्षदा आतुर..!!
आज तो दिवस आला .....
कोवळी सकाळ, उगवता सूर्य होता प्रकाशत,,
अशी मनी वसली, मिलनाची ती गोड दहशत,,
रात्रीची लाली चेहरा, आनंद मुखी विलासत..!!
आज तो दिवस आला .....
अविस्मरणीय त्या आठवणी, अजुनी ताज्या मनी..
निथळनारे केसंवारचे पाणी, उभी अशी सामोरी नाहूनी..
पाहावे ते रूप तुझे, दिसे मज ते मिटल्या लोचनी..!!
आज तो दिवस आला ...
एकटेपण हळू हळू का लागले जाणवू,,
करुनी संसार, वैराग्यासम का वळू,,
आठवणी तुझ्या मी का विसरू, का विसरू ..??

No comments:
Post a Comment