Thursday, January 12, 2012

' सगळं काही राहून गेलं '

' सगळं काही राहून गेलं '


बरचं काही तुला सांगायचं होतं,
पण सगळं मनातच राहून गेलं.
जसं मेघ आले होते ग् दाटून,
पण त्यांच बरसायचच राहून गेलं.

तु गेलीस आयुष्यातून निघुन,
अन् पाठोपाठ सूखही निघून गेलं.
जस गंध संपल्यावर फुलाला,
फुलपाखरू देखील सोडून गेलं.

पाहीतले होत मी स्वप्न तुझ्यासाठी,
पण ते साकारायचच राहून गेलं.
तुझ्यासाठी मी जगत असताना,
माझ्यासाठी जगायचच राहून गेलं.

तुझीच स्वप्न अन् तुझ्याच आठवणी,
'माझं' अस् आता काहीच नाही उरलं.
जस् काही अथांग सागरामधे आता,
ओँजळभर पाणीसुद्धा नाही राहीलं.

मरण ही दाराशी येऊन माझ्या,
मला दगा देऊन निघुन गेलं.
माझ्यासाठी रचलेल्या चित्तेवर,
दुसरं कोणीतरीच जळून गेलं.




No comments:

Post a Comment