Tuesday, January 10, 2012

हृदयात मात्र एक छोटीशी जागा ठेव..

असचं सर्च करता करता,
तुला रिक्वेस्ट गेली..

आज उद्या करता करता,
तू मला अँड झाली..

तुझ्या विषयी बोलताना,
खरच वेगळ फिल होतंय..

पण तुलाचं ऐकायचं म्हणून,
शब्द स्वःताहून क्लीँक होतंय..

तुझ्या डोळ्यांमध्ये लपली,
आहे आनंदाची डबी..

ऐकलं नाही तुला कधी,
पण जाणवते मला गोड आवाजाची छबी..

माझ्यासाठी सुंदर आहेस तू,
हे सांगायचीच गरज नाही..

बोलताना तुझ्याशी माझा,
मीचं रमून जातो..

सतत राहावं आँनलाईन,
बाकी काहीचं सुचत
नाही..

चेह-यावर तुझं हास्य,
माझ्यासाठी असेचं राहो..

या वेगळ्या अशा मित्रासाठी,
हृदयात मात्र एक छोटीशी जागा ठेव..

No comments:

Post a Comment