Monday, January 7, 2013

माझी आठवण कधीतरी येईल तुला


माझी आठवण कधीतरी येईल
तुला'
माझी आठवण कधीतरी येईल
तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील
मला..... कुणालातरी माझी आठवण
सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत
मला पाहताच तू रडशील..... आठवेल तुला समुद्र
किनारी आपल्या दोघांच
फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात
मी स्वता हरवून जान..... तू माझा हातात हात घेउन अनेक
स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच
मला हसवण..... आठवेल
तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात
भिजणारी ती आपली हाउस..... ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात
अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात
मोहरून गेलेले ते अंग सारे..... माझी आठवण येताच मी जवळ
असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून
निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब
मी असेल.....
तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ
तडफडणार मन..... माझी आठवण कधीतरी येईल
तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल
मला.

No comments:

Post a Comment