माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू ….
तुझ्याविना आनंदातही मौज नाही ,
कोट्यावधी सुखातही रस नाही ,
माझ्या उदासीन ओठावरचे ‘ स्मितहास्य ‘ तू ….
मदतीने तुझ्या सारी कोडी सोडविली ,
तू साथ नसताना मिळालेली उत्तरेही चुकली ,
माझा गमावलेला दृढ ‘ आत्मविश्वास ‘ तू ….
अपयशी ठरे यशस्वी शिखर तुझ्याविना ,
पराजित वाटे हर अजिंक्य सामना ,
माझ्या यशाची खरी ‘ प्रेरणा ‘ तू …
तुझ्या डोळ्यांच्या प्रतीबिंबात हे सौंदर्य खुलले होते ,
सजली हिरेमोती पण प्रशंसणारे कोणीच नव्हते ,
माझ्या हृदयाचा ‘ आरसा ‘ तू ….
आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,
हर एक क्षण जागचा जागीच थांबला ,
माझा एकांतातील ‘ सहवास ‘ तू ….
प्रत्येक कंपनात तुझेच नाव होते ,
कोरे मन अजूनही तुझीच वाट पाहते ,
माझ्या श्वासाची ‘ आत्मा ‘ तू ….
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू …..
Wednesday, February 15, 2012
आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment