Tuesday, May 27, 2014

विसरून जा स्वप्न माझं.........

 

मीचं एक स्वप्न आहे,
स्वप्न माझं बघू नको..
पाहिलस जरी स्वप्न माझं,
माझ्यासाठी जगू नको..
अविचारी मन माझं,
विचार माझा करू नको..


केलास जरी विचार माझा,
माझ्यावरती मरू नको..
पुसून टाक अश्रू तुझे,
डोळ्यात तसेचं विरलेले..
मिटवून टाक नाव माझे,
हातावर तुझ्या कोरलेले..
विसरून जा स्वप्न माझं,
नशीब तुझं फसेल..
पाहिलसं माझं स्वप्न म्हणून,
जग तुझ्यावर हसेल..

_________________________________________________________

Labels

No comments:

Post a Comment