Tuesday, June 11, 2013

पाऊस

पाऊस हा आठवणीचा सये 
का या सरी संगे राहत नाही .
निघून जातात जश्या त्या सरि
का त्यांच्यासवे हा वाहत नाही? 

भिजतात पापण्या कधी तर
कधी हास्य चमकते गालावर
गुमानी हा पाऊस का नेहमी 
नाचवतो त्याच्याच तालावर?...

आज म्हटलं विचारावं त्याला 
का रे छळ मांडतोस या जीवाचा
तोच पलटून माझ्यावर बरसला 
सांग यात दोष आहे कुणाचा?

मी तर माझं काम करत असतो 
खेळ तुमच्याच मनाचे मांडत असतो 
तुम्हीच जेव्हा कोरडे होता माझ्याविना
मी तेव्हाच तुम्हाला भिजवत असतो ...

एवढंच सांगून तो परत निघून गेला
मी मात्र उभा तिथेच चिंब भिजलेला
आज कधी नव्हे तो एकाकी जीवाला
त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला .
त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला ...............

No comments:

Post a Comment