Tuesday, June 11, 2013

पावसात ती …..

पावसात ती …..

पाण्याने भिजलेली …
थंडी ने शहारलेली …

विजांच्या कडकडाटाने
घाबरलेली …

पावसाच्या थेंबांनी नटलेली …
ओलाव्याने सजलेली …

छत्रीत लपलेली …
चिखलावर थोडीशी रागावलेली …

पण वार्याने सुखावलेली …
दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …

स्वतः ची स्वतःच सावरलेली …
खोटी खोटी रुसलेली …

थोडीशी लाजलेली …
माझ्याशी हसलेली …

जोराच्या पावसात ….
काळ्या ढगांच्या काळोखात …

छत्र्यांच्या गर्दीत ….
खरंच ती …
ती फार सुंदर दिसत होती.........

पाऊस

पाऊस हा आठवणीचा सये 
का या सरी संगे राहत नाही .
निघून जातात जश्या त्या सरि
का त्यांच्यासवे हा वाहत नाही? 

भिजतात पापण्या कधी तर
कधी हास्य चमकते गालावर
गुमानी हा पाऊस का नेहमी 
नाचवतो त्याच्याच तालावर?...

आज म्हटलं विचारावं त्याला 
का रे छळ मांडतोस या जीवाचा
तोच पलटून माझ्यावर बरसला 
सांग यात दोष आहे कुणाचा?

मी तर माझं काम करत असतो 
खेळ तुमच्याच मनाचे मांडत असतो 
तुम्हीच जेव्हा कोरडे होता माझ्याविना
मी तेव्हाच तुम्हाला भिजवत असतो ...

एवढंच सांगून तो परत निघून गेला
मी मात्र उभा तिथेच चिंब भिजलेला
आज कधी नव्हे तो एकाकी जीवाला
त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला .
त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला ...............

तुझी आठवण आल्याशिवाय, मी श्वास घेत नाही.....

हुंदके मनाचे तुला का,

ऐकू येत नाही.....

अश्रूं डोळ्यातले तुला का,

दिसत नाही.....

रोज रोज आठवते सुंदर,

सहवास तुझा.....

आता आठवणींचे ते दिवस,

पुन्हा का येत नाही.....

तुझ्याशिवाय खरं तर,

मला करमतचं नाही.....

कारण ?????

तुझी आठवण आल्याशिवाय,

मी श्वास घेत नाही.....

आज हृदय माझं खूप दुःखतय रे,

आज हृदय माझं खूप दुःखतय रे,

वेदनेनी मी खरचं खूप तळमळतेय रे.....

एक वेळा तरी लक्ष दे माझ्याकडे,

ही अपेक्षा मी आता पण ठेवतेय रे.....

कोणी म्हणतं मला मी मूर्ख आहे,

कोणी म्हणतं मला डोकचं नाही.....

त्यांना नाही कळत ते,

तू तरी एक वेळ समजून घे रे.....

तुझी वाट बघत मी जगतेय रे,

वाटेतले काटे मला खूप रूततात रे.....

येऊन एक वेळ दाखव माझी वाट,

ही इच्छा तुझ्याजवळ व्यक्त करतेय रे.....

बोलायचं आहे मला खूप काही,

पण ?????

तुला आणि वेळेला मी घाबरतेय रे.....

आता तरी तू समजून घे माझा त्रास,

तुजविण या जगात मी खूप एकटी आहे रे.....

तुजविण या जगात मी खूप एकटी आहे रे.....
        

Saturday, June 1, 2013

डुबुक- रघू दंडवते

कहाणी ऐका एका वेश्येची

कहाणी ऐका एका वेश्येची
पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची
पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची
कहाणी ऐका एका वेश्येची.....

बालपण सगळ चिखलातच गेल
आईच दुधपण बाटलीतूनच पिल
जगायचं रडगाण पण लवकरच कळल
कहाणी ऐका एका वेश्येची....

शाळा कसली माहीतच नाही
शिक्षणाचा तर मला गंधच नाही
भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही
पशूंचा सहवास तर नवीनच नाही
कहाणी ऐका एका वेश्येची.....

कोमार्याची माझ्या कुणाला चाडच नाही
देहाची तर कुणालाच किमत नाही
भावनांची कदरही कुणालाच नाही
प्रेम तर माझ्या नशिबातच नाही
कहाणी ऐका एका वेश्येची...

संसार पडलाय उघड्यावर
सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर
संसाराचा गाडा माझ्याच देहावर
कहाणी ऐका एका वेश्येची.....

रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल
वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल
समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल
कहाणी ऐका एका वेश्येची....

तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं
नरकातून या बाहेर ढकललं
आमच आयुष्य असच गंजल
त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल
कहाणी ऐका एका वेश्येची....

आज समाजात वेश्या असूनही इतके बलात्कार होतात....त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे फार मुश्कील झाले असते .....हे एक वास्तव आहे .........

स्त्रोत: भारतीय नागरिक